कंटेनर व कारची समोरासमोर धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 14:51 IST2018-05-22T14:51:29+5:302018-05-22T14:51:29+5:30

ठाण्यामध्ये घोडबंदर रोड येथे कंटेनर आणि एका वाहनाची धडक होऊन अपघात झाला.

सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, शौकत अली (25) आणि मोहीन (17) हे दोन जण जखमी झालेले आहेत.

दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे.

अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.