लुटारू भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2018 23:45 IST2018-02-15T23:42:32+5:302018-02-15T23:45:25+5:30

मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक व मोदी, शाह आणि जेटली यांचे छायाचित्र घेऊन निषेध नोंदवला आहे.
पेट्रोल, डिझेल व गॅसवर अत्याचारी कर व उपकर लादून जनतेस महागडे इंधन विकून त्यांची लूट करणाऱ्या भाजपा सरकारला लुटारू सरकार संबोधत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला.
भाजपाने 2014मध्ये सत्तेवर आल्यास इंधनाचे दर कमी करू, असे आश्वासन दिलं होते.
जनतेची मोदी सरकारनं घोर फसवणूक केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.