मरेला अश्रू आवरेना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 18:15 IST2018-08-03T18:10:17+5:302018-08-03T18:15:16+5:30

दुखापतीमुळे बराच काळ कोर्टपासून दुरावलेल्या अँडी मरेने सिटी ओपन टेनिस स्पर्धेतून पुनरागमन केले. मात्र गुरूवारी पहाटे तीन वाजेपर्यंत त्याला कोर्टवर खेळावे लागले आणि त्यावेळी त्याला अश्रु अनावर झाला. मरेने आयोजकांवर त्यानंतर कडकडून टीका केली.
उपउपांत्यपूर्व फेरीच्या या लढतीत 31 वर्षीय मरेला तीन तास संघर्ष केला. त्यामुळे ही लढत पूर्ण व्हायला पहाटेचे 3 वाजले
मरेने मॉरिस कोपिलविरूद्धचा हा सामना 7-6(5), 3-6, 7-6(4) असा जिंकला.
पुढील फेरीत त्याला ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स डी मिनौरचा सामना करावा लागणार आहे
मध्यरात्री या सामन्याला सुरूवात झाली आणि त्यानंतर तीन तास 01 मिनिट हा सामना रंगला.