शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जपानची टेनिस क्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 12:15 PM

1 / 5
केई निशिकोरी आणि नाओमी ओसाका यांनी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला. एकाच ग्रँडस्लॅम स्पर्धेत जपानच्या महिला व पुरुष खेळाडूने उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
2 / 5
निशिकोरीने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात माजी विजेत्या मरिन सिलिचचा 2-6, 6-4, 7-6(7/5), 4-6, 6-4 अशा रोमहर्षक विजय मिळवला. 2014च्या अंतिम फेरीत सिलिचने निशिकोरीला पराभूत केले होते.
3 / 5
ओसाकाने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत युक्रेनच्या लेसिया त्सुरेंकोवर 6-1, 6-1 असा पराभव केला.
4 / 5
20 वर्षीय ओसाका ही ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करणारी 1996नंतर पहिली जपानी महिला खेळाडू आहे. किमिको डेट ही ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारी अखेरची महिला होती.
5 / 5
निशिकोरीने तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी त्याने 2014 व 2016 मध्ये ही भरारी घेतली होती.
टॅग्स :US Open 2018अमेरिकन ओपन टेनिसTennisटेनिस