यू-ट्यूब का बिग बॉस कौन है? लखनौ ते सिलिकॉन व्हॅली; नील मोहन यांचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 11:38 AM2024-04-16T11:38:49+5:302024-04-16T11:42:32+5:30

३१ अब्ज ५० कोटी अमेरिकन डॉलर्स २०२३ साली यू-ट्यूबचा एकूण महसूल.

२०२३ साली यू-ट्यूबचा एकूण महसूल होता तब्बल ३१ अब्ज ५० कोटी अमेरिकन डॉलर्स इतका अगडबंब... यू-ट्यूब शॉर्टस, यूट्यूब म्युझिक आणि यूट्यूब प्रीमियम यांचा या महसुलात सिंहाचा वाटा आहे.

वापरकर्त्यासाठी जगभरात फुकट असलेले यू-ट्यूब (अर्थात पैसे देणारे प्रीमियम सभासद वगळता) पैसे कमावते ते जाहिराती आणि अन्य अनेक मार्गातून! ही सारी व्यवस्था डिझाइन करण्यामागे 'डोके' आहे ते यू-ट्यूबचे सीईओ नील मोहन यांचे.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे शिकून अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये गेलेले नील मोहन सध्या यू-ट्यूबवर राज्य करतात.

नील यांचा लखनौ ते सिलिकॉन व्हॅली हा प्रवास प्रेरणादायी आहे. अमेरिकेतील इंडियाना येथे १९७३ मध्ये त्यांचा जन्म झाला. सेंट फ्रान्सिस कॉलेज लखनौ येथे शिक्षण १९८६ ते १९९१.

१९९६ - स्टॅनफर्डमधून पदवी, १९९६ - अक्सेंचरमध्ये नोकरीला सुरुवात, १९९७ - नेटाग्रॅव्हिटी या स्टार्टअपमध्ये प्रवेश टेक ओव्हर केलेली कंपनी.

२००४ - मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्नशिप, २००५ - डब्लक्लिकला संकटातून बाहेर काढण्यास मदत, २००७ - गुगलने डबलक्लिक टेकओव्हर केल्यावर गुगलमध्ये प्रवेश, २००८ गुगलमध्ये डिस्प्ले आणि व्हिडीओ जाहिरातीवर काम.

२०१५ यू-ट्यूबचे सीपीओ, २०१५ यू-ट्यूब टीव्ही, शॉर्ट्स, म्युझिक आणि प्रीमियम यांची बांधणी आणि २०२३ - यू-ट्यूबचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर. (संदर्भ -फिनशॉट्स)