Lokmat Tech Tips: अनेक वर्ष वापरून देखील नव्या सारखा राहील तुमचा स्मार्टफोन; फक्त या 5 गोष्टींची काळजी घ्या

By सिद्धेश जाधव | Published: January 25, 2022 07:43 PM2022-01-25T19:43:40+5:302022-01-25T19:57:00+5:30

Lokmat Tech Tips: स्मार्टफोन युजर्स आपल्या फोनची काळजी घेत नाहीत. त्यामुळे स्मार्टफोन 1-2 वर्षात जुने वाटू लागतात. फक्त लूकवरून नव्हे तर फोनचा स्पीड देखील कमी होतो आणि फोन हँग होऊ लागतो.

आज आम्ही तुम्हाला 5 टिप्स सांगणार आहोत. ज्या रोजच्या वापरत वापरल्यास तुमचा वर्षानुवर्षे नव्यासारखा राहील.

स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टमसाठी वेळावेळी अपडेट येत असतात. तसेच सिक्योरिटी अपडेट देखील पाठवले जातात. हे अपडेट इन्स्टॉल करून फोन अपडेटेड ठेवावा म्हणजे नवीन फीचर्ससह आतून सुरक्षा देखील मिळेल.

स्मार्टफोन्समध्ये धोकादायक मालवेयरचा शिरकाव अ‍ॅप्लिकेशन द्वारे होतो. त्यामुळे विश्वासू आणि अधिकृत सोर्सवरून अ‍ॅप्स डाउनलोड करा. यासाठी गुगल प्ले स्टोर किंवा अ‍ॅप्पल अ‍ॅप स्टोरचा वापर करा. अ‍ॅप डाउनलोड करण्याआधी युजर्सचे रिव्यू, डेव्हलपरचं नाव इत्यादी चेक करा.

फोनमध्ये अनेक अ‍ॅप्सच्या कॅशे फाईल्स स्मार्टफोनला हँग करतात. त्यामुळे वेळोवेळी स्मार्टफोनमधून Cache क्लियर करा. अँड्रॉइड फोन युजर्स Settings मध्ये Storage मध्ये जाऊन इंटरनल स्टोरेजमधील Cached data क्लियर करू शकतात.

स्मार्टफोन हातातून पडल्यावर फुटू शकतो. त्यामुळे नवीन फोन आल्यावर त्यासाठी सर्वप्रथम चांगलं मजबूत कव्हर विकत घ्यावं. अनेक स्मार्टफोन कंपन्या हल्ली फोन सोबत सिलिकॉन कव्हर देखील देतात ते देखील तुम्ही वापरू शकता.

स्क्रॅच गार्ड किंवा स्क्रीन प्रोटेक्शन तुमच्या फोनच्या स्क्रीनचं संरक्षण करतो. फक्त स्क्रॅचेस नव्हे तर फोन उंचावरून पडल्यावर जाणारे देखील यामुळे वाचतात.