जबरदस्त स्पीड मिळणार! रिलायन्स जिओने ५.५ जी सेवा केली सुरू; काय फायदा मिळणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 13:57 IST2025-01-10T13:43:38+5:302025-01-10T13:57:37+5:30
Reliance Jio : रिलायन्स जिओने नवीन Jio 5.5G सेवा सुरू केली आहे. आता या 5.5G सेवेमुळे नेटकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

Reliance Jio : रिलायन्स जिओने 5.5G सेवा सुरू केली आहे. देशभरात अजूनही 5G सेवा पोहोचलेली नाही, त्याआधीच आता 5.5G सेवा सुरू होणार आहे. यात 5G पेक्षा जास्त स्पीड मिळणार आहे.
5.5G सेवेला 5G चे पुढचे व्हर्जन म्हटले जाते. या नेटवर्कला 5G Advance व्हर्जनही म्हटले जाते, यामुळे वापरकर्त्यांना आणखी जास्त स्पीड मिळणार आहे.
5.5G मध्ये वापरकर्त्यांना आता असणाऱ्या स्पीड पेक्षा चांगले स्पीड मिळणार आहे. Jio 5.5G मध्ये वापरकर्त्यांना 1GBps पेक्षा जास्त स्पीड मिळणार आहे.
5.5G सेवा ही सध्याच्या 5G नेटवर्कचे पुढचे व्हर्जन आहे. हे सुरुवातीच्या 5G स्टॅडर्डवर आधारीत तयार केले आहे. हे हाय स्पीड करण्याच्या उद्देशाने केले आहे.
मल्टी कॅरियर अॅग्रीगेशनच्या मदतीने, वापरकर्त्यांना 5.5G नेटवर्कवर 10Gbps पर्यंत जास्तीत जास्त डाउनलिंक स्पीड आणि 1Gbps ची अपलिंक स्पीड मिळेल.
यामुळे पर्सनल आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी मोठा फायदा होणार आहे. जिओ ही सेवा देणारी एकमेव कंपनी नाही. जगभरातील अनेक कंपन्या या सेवा देतात. फक्त भारतात ही सेवा देणारी जिओ एकमेव कंपनी आहे.
मल्टी सेल कनेक्टिव्हिटीसह जिओ 5.5G नेटवर्क लाँच करण्यात आले आहे. तुम्ही एकाच वेळी अनेक नेटवर्क सेलशी कनेक्ट होऊ शकाल, जे वेगवेगळ्या टॉवर्समधून देखील असू शकतात. यामुळे तुम्हाला चांगले कव्हरेज आणि वेगवान इंटरनेट स्पीड मिळेल.
ज्या क्षेत्रात नेटवर्कची गर्दी जास्त असेल त्या ठिकाणी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल. 5.5G उद्योगासाठी चांगल्या क्षमता देखील आणेल. या नेटवर्कमुळे इंटरनेटचे स्पीड आतापेक्षा जास्त वाढणार आहे.
काही फोनमध्ये ही सेटिंग आपोआप सक्रिय होते, पण काही फोनमध्ये तुम्हाला ती मॅन्युअली सक्रिय करावी लागते. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला सेल्युलर पर्यायावर जावे लागेल. काही फोनमध्ये हा पर्याय मोबाईल नेटवर्कच्या नावाने उपलब्ध मिळतो.
तुम्हाला नेटवर्क सेटिंग्जसाठी अनेक पर्याय मिळतील. येथे तुम्हाला Preferred Network वर जावे लागेल. आता तुम्हाला ऑटो अपग्रेडच्या नावाखाली दोन पर्याय मिळतील. एक पर्याय 4G/3G/2G (ऑटो) असेल, तर दुसरा पर्याय 5G/4G/3G/2G (ऑटो) असेल. म्हणजेच तुम्ही कुठे असाल तिथे जे नेटवर्क असेल त्या सिग्नलवर तुमचा फोन अपग्रेड होईल.