WhatsApp ची नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करा, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 10:07 AM2021-01-06T10:07:25+5:302021-04-19T13:29:10+5:30

फेसबुकच्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या टर्म्स आणि प्रायव्हसी पॉलिसीला अपडेट केले आहे. याचे नोटिफिकेशन भारतात मंगळवारी संध्याकाळपासून युजर्संना पाठविण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप युजर्सला नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करण्यासाठी ८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. तोपर्यंत युजर्सला पॉलिसी अॅक्सेप्ट करावी लागेल, अन्यथा अकाऊंट डिलीट करावे लागेल.

युजर्सला आपले अकाऊंट सुरुच ठेवण्यासाठी नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करणे गरजेचे असणार आहे. यासाठी दुसरा कोणताही ऑप्शन युजर्सला मिळणार नाही.

दरम्यान, सध्या येथे 'नॉट नाउ' चा ऑप्शन सुद्धा दिसत आहे. म्हणजेच जर तुम्ही नवीन पॉलिसी काही दिवस अॅक्सेप्ट नाही केली, तरी तुमचे अकाऊंट सुरुच राहील.

नवीन पॉलिसीमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन जास्त आहे. तसेच, आता युजर्सचा आधीपेक्षा जास्त डेटा फेसबुकजवळ राहील.

व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा आधीही फेसबुकसोबत शेअर करण्यात येत होता. मात्र, कंपनीने स्पष्ट केले आहे की, फेसबुकसोबत व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामचे इंटीग्रेशन जास्त राहील.

व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटेड पॉलिसीमध्ये आपल्याकडून कंपनीला दिल्या जाणाऱ्या लायसन्समध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, आमची सर्व्हिस ऑपरेट करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचा जो कंटेंट तुम्ही अपलोड, सबमिट, स्टोअर, सेंड किंवा रिसिव्ह करता. तो युज, रिप्रोड्यूस, डिस्ट्रीब्यूट आणि डिस्प्ले करण्यासाठी जगभरात नॉन-एक्सक्लुसिव्ह, रॉयल्टी फ्री, सब्लिसेंसेबल आणि ट्रान्सफरेबल लायसन्स देत आहोत.

याचबरोबर, यामध्ये म्हटले आहे की, या लायसन्समध्ये तुम्ही दिलेले अधिकार आमच्या सेवा ऑपरेट करणे आणि प्रदान करण्याच्या मर्यादित उद्देशाने आहेत.