तंत्रज्ञानाची किमया! पूर्णपणे बदललं WhatsApp; आता मिळणार नवीन डिझाईन, जाणून घ्या, कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:15 AM2024-03-20T11:15:15+5:302024-03-20T11:22:40+5:30

WhatsApp अपडेटमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया...

WhatsApp आपल्या एपमध्ये वेळोवेळी बदल करत असतं. युजर्सना फ्रेश एक्सपीरियन्स देण्यासाठी, कंपनी या प्लॅटफॉर्मवर सतत काहीतरी नवीन आणत असते. असाच काहीसं आता WhatsApp अँड्रॉईड युजर्ससाठी आणलं आहे. कंपनीने सध्याच्या WhatsApp चा संपूर्ण लुक बदलला आहे.

युजर्स या अपडेटची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अलीकडेच कंपनी त्याची बीटा व्हर्जनवर टेस्ट करत होती. या अपडेटनंतर अँड्रॉईड युजर्सना iOS प्रमाणे WhatsApp चे डिझाईनही पाहायला मिळेल. WhatsApp अपडेटमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊया...

जर तुम्ही WhatsApp चं लेटेस्ट व्हर्जन इन्स्टॉल केलं असेल तर तुम्हाला नवीन लुक मिळेल. आता चॅट्स, अपडेट्स, कम्युनिटी आणि कॉल्स हे सर्व पर्याय वर दिसणार नाहीत. कंपनीने हा संपूर्ण बार खाली हलवला आहे. त्यांच्या पोझिशनमध्ये बदल करण्यात आला आहे.

जिथे आधी कम्युनिटी सुरुवातीला दिसत होती. त्यानंतर चॅट्स, अपडेट्स आणि कॉल्सचे पर्याय यायचे. आता सर्वप्रथम तुम्हाला चॅट, नंतर अपडेट्स, कम्युनिटी आणि कॉल्सचा पर्याय मिळेल. मात्र, कंपनीने अद्याप या अपडेटबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हा बदल तुमच्या WhatsApp वर दिसत नसल्यास, तुम्हाला लेटेस्ट अपडेट इन्स्टॉल करावं लागेल. यासाठी तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जावे लागेल. येथे तुम्हाला WhatsApp सर्च करावे लागेल.

तुम्हाला त्यानंतर अपडेटचा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करून तुम्ही एप अपडेट करू शकता. कंपनीने अलीकडेच या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन फीचर्स जोडलेले आहेत.

यावर तुम्ही आता एक मिनिटापर्यंतचा व्हिडीओ रेकॉर्ड करून पाठवू शकता. तुम्ही हा क्विक व्हिडिओ अगदी सहजपणे शूट करू शकता. याशिवाय तुम्ही व्ह्यू वन्स मोडमध्ये व्हॉइस मेसेजही पाठवू शकता. कंपनीने इतरही अनेक फिचर्स जोडले आहेत.

WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात सध्या WhatsApp चा वापर हा केला जातो. WhatsApp देखील आपल्या युजर्सच्या चॅटींगची गंमत आणखी वाढावी यासाठी सतत प्रयत्न करत असतं.