शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

WhatsApp new feature: 'व्हॉट्सअ‍ॅप'ने आणलं भन्नाट फीचर, आता स्वत:लाही करू शकता मेसेज! कसं वापराल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 1:43 PM

1 / 6
Whatsapp new feature message yourself: सोशल मीडिया अ‍ॅप्सचा वापर सध्या झपाट्याने वाढला आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हल्ली आपले विचार किंवा फोटो पोस्ट करण्याबरोबरच एखाद्या व्यक्तीला DM म्हणजे डायरेक्ट मेसेज करण्याचीही सुविधा असते. हाईक किंवा सध्या मोठ्या फाईल्स आणि फोल्डर्सदेखील ट्रान्सफर केले जाणारे टेलिग्राम या अ‍ॅप्सचा वापरदेखील मेसेंजरसारखा केला जातो.
2 / 6
दुसऱ्याशी चॅटिंग करणं हे अतिशय सामान्य झालं असलं तरी त्याच वेळी, काही गोष्टींची नोंद आपल्या स्वत:कडे ठेवायची असेल तर तुम्ही काय करता? एखादा चांगला लेख किंवा एखादी व्हिडीओ किंवा अगदी एखादा स्वत:चाच फोटो जर तुम्हाला आवडला, तर तो स्वत:ला पाठवून ठेवावा असं तुम्हाला नेहमीच वाटत असतं. याचाच विचार करून आपल्या सर्वांच्या लाडक्या व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन सुविधा आणली आहे.
3 / 6
फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम सारख्या अ‍ॅप्समध्ये तुम्ही स्वतःला मेसेज करू शकता हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण आता व्हॉट्सअ‍ॅपवर देखील ही सुविधा सुरू झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या अपडेटमध्ये युजर्सना स्वतःला मेसेज पाठवणे शक्य होणार आहे.
4 / 6
Message Yourself नावाची सुविधा व्हॉट्सअ‍ॅप बरेच दिवसांपासून येणार असल्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती. पण तो प्रकार नक्की कसा असेल, याची फारशी कल्पना देण्यात आली नव्हती. आता मात्र याबद्दलची संकल्पना आणि सुविधा स्पष्टपणे वापरात आली आहे. या सुविधेने अनेक प्रकारची कामे करता येतात.
5 / 6
स्वतःला संदेश कसा पाठवायचा- नोट्स बनवणे, कामाच्या याद्या बनवणे, खरेदीच्या याद्या यांसारख्या गोष्टींसाठी हा नवा अपडेट सर्वोत्तम असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे. तुम्हाला स्वतःला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवायचा असेल, तर तुम्हाला फक्त मेन्यू ओपन करून Contacts वर जावे लागेल. त्यात यादीच्या सर्वात वर तुम्हाला स्वत:चे नाव दिसेल.
6 / 6
स्वत:च्या नावावर टॅप करून तुम्ही स्वत:ला मेसेज करू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पाठवलेले संदेश आपोआप सिंक केले जातात. तुम्ही इतर कोणत्याही डिव्‍हाइसमध्‍ये WhatsApp उघडले की तुम्हाला मेसेज दिसतात. हे फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये तुमचे व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करा. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ही सुविधा अँड्रॉईड आणि iOS दोन्ही फोन्स साठी आहे.
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडApple Incअॅपल