आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 12:30 IST2025-08-05T12:13:59+5:302025-08-05T12:30:26+5:30

WhatsApp वापरणारे WhatsApp वापरत नसलेल्यांशी देखील चॅट करू शकतील.

WhatsApp मध्ये आता गेस्ट मोड एका अतिशय खास फीचरसह लवकरच येणार आहे. त्याच्या मदतीने WhatsApp वापरणारे WhatsApp वापरत नसलेल्यांशी देखील चॅट करू शकतील.

WhatsApp च्या अपकमिंग फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WAbetainfo ने या फीचरबद्दल माहिती दिली. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, हे नवीन फीचर WhatsApp बीटाच्या अँड्रॉइड 2.25.22.13 व्हर्जनमधून याबाबत माहिती मिळालेली आहे.

लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये असं दिसून आलं आहे की, मेसेजिंग एप एका नवीन फीचरवर काम करत आहे, जे WhatsApp युजर्सना WhatsApp वापरत नसलेल्या लोकांशी चॅट करण्याचा पर्याय देईल.

WAbetainfo ने एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये गेस्ट मोडबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याच्या मदतीने WhatsApp वापरणारे WhatsApp वापरत नसलेल्यांशी चॅट करू शकतील.

सर्व टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर, ते स्टेबल व्हर्जनसाठी रिलीज केलं जाईल. मात्र यासाठी कोणतीही टाइमलाइन नमूद केलेली नाही.

गेस्ट मोड प्रत्यक्षात WhatsApp च्या इको-सिस्टममध्ये काम करेल. यामुळे WhatsApp युजर्सना मोठा फायदा होईल आणि ते WhatsApp वापरत नसलेल्यांशीही बोलू शकतील.

Wabetainfo वर दिलेल्या माहितीनुसार, युजर्सना गेस्ट मोड अंतर्गत चॅट तयार करण्याचा पर्याय मिळेल.

यामध्ये WhatsApp युजर्सना सर्वप्रथम WhatsApp वापरत नसलेल्या व्यक्तीला इनव्हाईट करावं लागेल. त्यानंतर त्याला एक लिंक मिळेल.

लिंकवर क्लिक केल्यानंतर, WhatsApp वापरत नसलेल्यांना ग्रँट्स एक्सेस द्यावा लागेल. ही लिंक ईमेल किंवा इतर मेसेजिंग एप्सद्वारे देखील ट्रान्सफर करता येते.

यानंतर दोन्ही युजर्समध्ये एक नेटवर्क सिस्टम सेट अप केली जाते. यानंतर ते एकमेकांशी चॅट करू शकतात. मात्र यामध्ये काही मर्यादा असतील. WhatsApp युजर्सना याचा फायदा होऊ शकतो.