Whatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं?; आता सर्वच समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 02:39 PM2019-08-20T14:39:32+5:302019-08-20T14:43:34+5:30

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने नातेवाईक, मित्रमैत्रिणींना टेक्स्ट मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. 

व्हॉट्सअ‍ॅपवर कोणत्या व्यक्तीला आपण किती फोटो, स्टीकर्स, व्हिडीओ, ऑडिओ मेसेज आणि डॉक्युमेंट्स पाठवले हे देखील पाहता येतं. कसं पाहायचं हे जाणून घेऊया. 

व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यावर सर्वप्रथम 'सेटिंग्स' (Settings) वर क्लिक करा.

'सेटिंग्स' (Settings) वर क्लिक केल्यानंतर काही पर्याय समोर दिसतील. त्यामध्ये 'डेटा अँड स्टोरेज युजेज' (Data and storage usage) वर क्लिक करा.

'डेटा अँड स्टोरेज युजेज' वर क्लिक केल्यावर 'स्टोरेज युजेज' (storage usage) चा पर्याय दिसेल. 

क्लिक केल्यानंतर युजर्ससमोर एक लिस्ट येईल. ज्यामध्ये कोणत्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सनी किती स्टोरेज स्पेस घेतलं आहे याची माहिती मिळेल. 

युजर्सच्या नावासमोर आपण कोणाला किती मेसेज, फोटो, व्हिडीओ पाठवले आहेत याची माहिती मिळेल. 

व्हॉट्सअ‍ॅप युजर्स ही स्टोरेज स्पेस फ्री करू शकतात. त्यासाठी Free up Space वर क्लिक करा. त्यामध्ये कोणत्या गोष्टी डिलीट करायच्या आहेत त्या सिलेक्ट करून डिलीट करा.