नव्या 'लखपती' आयफोनच्या बदल्यात काय-काय करता येईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 16:40 IST2018-09-13T16:32:12+5:302018-09-13T16:40:19+5:30

या लाखभररुपयांत तुम्ही बरेच काही करू शकणार आहात. महाराष्ट्रातील सध्याचा पेट्रोलचा दर 88 रुपये आहे. आयफोनच्या किंमतीत तुम्ही तब्बल 21 महिन्यांचे पेट्रोल भरू शकता (दिवसा 2 लीटर).
लखपती आयफोनच्या किंमतीत 20 हजार रुपये प्रती महिना प्रमाणे पाच महिन्यांचे घरभाडे भरू शकता.
नव्या आयफोनच्या किंमतीत 589 रुपये प्रती महिना असा 14 वर्षांचा डॉक्टर, औषधोपचाराचा नियमित खर्च करू शकता.
आयफोनच्या किंमतीमध्ये एक भारतीय व्यक्ती तब्बल 15 महिने हॉटेलमध्ये जेवण करू शकतो. महिन्याचा खर्च 6500 रुपये प्रती व्यक्ती.
महागड्या आयफोनच्या किंमतीच्या बदल्यात 16 ठिकाणी फिरायला जाऊ शकता. फिरण्याचा खर्च 6358 रुपये प्रती टूर.