काय आहे Dogecoin? ज्यामुळे एक व्यक्ती दोन महिन्यात करोडपती बनला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 02:34 PM2021-04-30T14:34:21+5:302021-04-30T17:21:24+5:30

Dogecoin च्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे.

कोरोना संकट काळापासून क्रिप्टो करन्सीचे (चलन) मूल्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हे एक नवीन उंची गाठत आहे. Bitcoin आणि Ethereum दररोज नवीन करोडपती बनवित आहेत. आता अशाच प्रकारची एक करन्सी आहे, Dogecoin ज्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही. याबाबत टेस्लाचे सीईओ Elon Musk सतत चर्चा करत असतात.

Dogecoin च्या मूल्यात मोठी वाढ झाली आहे. सात दिवसांच्या ट्रेडिंग विंडोमध्ये यात 300 टक्क्यांहून अधिक वाढ मिळविली आहे. अलीकडेच एका व्यक्तीने असा दावा केला होता की, Dogecoin मुळे तो करोडपती बनला. दरम्यान, Dogecoin म्हणजे काय आणि आपण ते भारतात कसे खरेदी करू शकता, याविषयी जाणून घेऊया...

Dogecoin हे Bitcoin सारखेच एक क्रिप्टो करन्सी आहे. हे 2013 मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर Billy Markus आणि Jackson Palmer यांनी सुरु केले होते. हे क्रिप्टो Doge मीमवर आधारित होते. हे Bitcoin पेक्षा फास्टर आणि फन ऑप्शन म्हणून सुरू करण्यात आले होते.

क्रिएटर्सनी असेही म्हटले की, Dogecoin ची व्यंग्य म्हणून सुरुवात केली गेली होती. त्यावेळी Bitcoin चे मूल्य 20,000 डॉलरपर्यंत पोहोचल्यानंतर अनेक फ्रॉड क्रिप्टो करन्सी आल्या होत्या. बरेच लोक या मजेशीर क्रिप्टो करन्सीला खूप फॉलो करत होते.

CoinGecko च्या मते याचे मूल्यांकन 34 अब्जांपलीकडे गेले आहे. Dogecoin प्रति नाण्याचे मूल्य सध्या सुमारे 0.38 डॉलर (सुमारे 28.53 रुपये) आहे. Dogecoin बद्दल विशेष गोष्ट अशी आहे की, ती लिमिटलेस (अमर्याद) क्रिप्टो करन्सी आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जगामध्ये Dogecoin किती आहे, याची कोणतीच मर्यादा नाही. आतापर्यंत 113 ला माइन करण्यात आले आहे. दुसरीकडे, Bitcoin वर मर्यादा आहे. यामध्ये 21 मिलियन नाणी असू शकतात.

Dogecoinच्या अचानक वाढीमागे अनेक कारणे आहेत. हे Coinbase सारख्या प्रमुख डिजिटल करन्सी प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले गेले आहे. याशिवाय, या फेसम सेलिब्रिटीजचे याला सहकार्य मिळत आहे. यामध्ये Snoop Dogg, Gene Simmons आणि Elon Musk यांचा समावेश आहे. हे वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे Reddit ग्रुप SatoshiStreetBets याला सतत पंप करत आहेत.

यामुळे बर्‍याच गुंतवणूकदारांचा असा विश्वास आहे की, हे फक्त बबल आहे, म्हणूनच ते त्यात गुंतवणूक करणे टाळत आहेत. अमर्यादित पुरवठ्यामुळे, ही भीती आणखीनच अधिक आहे की मूल्य जास्त काळ होल्डवर राहणार नाही.

भारत आणि इतर बर्‍याच देशांमध्ये Dogecoin सपोर्ट करत नाही. यामुळे, तुम्ही क्राइप्टो एक्सचेंज WazirX, Binance, Coindesk ओपन केल्यास तुम्ही ते पाहू शकणार नाही. यासाठी तुम्ही बेस करन्सी बदलू शकता.

यानंतर, तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने वॉलेटमध्ये पेमेंट करून रुपयाला अमेरिकी डॉलरमध्ये बदल करू शकता. यानंतर तुम्ही प्लॅटफॉर्मनुसार ते खरेदी करू शकता. यासाठी, पूर्ण गाइड प्लॅटफॉर्मच्या पोर्टलवर उपलब्ध आहे.