YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 15:37 IST2025-09-21T15:26:25+5:302025-09-21T15:37:55+5:30

आजच्या डिजिटल युगात YouTube हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर अनेकांसाठी कमाईचा एक मोठा मार्ग बनले आहे.

आजच्या डिजिटल युगात YouTube हे केवळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नाही, तर अनेकांसाठी कमाईचा एक मोठा मार्ग बनले आहे. लाखो लोक इथे व्हिडीओ तयार करून आपली कला जगासमोर आणत आहेत आणि सोबतच चांगली कमाईही करत आहेत. पण, अनेक नवीन क्रिएटर्सना असा प्रश्न पडतो की, युट्यूब चॅनल कधी मॉनेटाइज होतो आणि पैसे कमावण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात?

युट्यूबवरून पैसे कमावण्यासाठी तुमचे चॅनल प्रथम YPP अर्थात युट्यूब पार्टनर प्रोग्राममध्ये सामील होणे आवश्यक आहे. यासाठी काही सोप्या पण महत्त्वाच्या अटी आहेत. यासाठी तुमच्या चॅनलवर किमान १,००० सबस्क्राइबर्स असणे अनिवार्य आहे. मागील १२ महिन्यांत तुमच्या व्हिडिओंचा एकूण ४,००० तासांचा वॉच टाइम पूर्ण होणे आवश्यक आहे.

जर तुम्ही लांब व्हिडिओऐवजी शॉर्ट्स बनवत असाल, तर तुमच्यासाठी वेगळे नियम आहेत. तुम्हाला मागील ९० दिवसांत किमान १ कोटी अर्थात १० मिलियन व्ह्यूज मिळवावे लागतील. या अटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही YPP साठी अर्ज करू शकता.

अनेक नवीन क्रिएटर्सना वाटते की चॅनल सुरू करताच पैसे मिळायला लागतील, पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मॉनेटाइजेशनचा मार्ग सोपा करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

तुमचे व्हिडीओ जितके युनिक आणि आकर्षक असतील, तितकेच प्रेक्षक वेगाने वाढतील. आठवड्यातून किमान २-३ व्हिडीओ अपलोड करा. यामुळे तुमच्या चॅनलवर नियमितपणे व्हिजिटर्स येत राहतात आणि सबस्क्राईबर्स लवकर वाढतील. जे विषय सध्या चर्चेत आहेत, त्यावर व्हिडीओ बनवल्यास तुमचे व्ह्यूज खूप वेगाने वाढतात.

व्हिडिओची चांगली क्वालिटी, स्पष्ट आवाज, आणि चांगले एडिटिंग तुमच्या कंटेंटला अधिक प्रोफेशनल बनवते. व्हिडिओचे शीर्षक, वर्णन आणि टॅग्समध्ये योग्य कीवर्ड्स वापरल्यास व्हिडीओ सर्चमध्ये वर दिसतो आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचतो.

एकदा तुमचा चॅनल YPP मध्ये सामील झाले की, तुमच्या व्हिडीओवर जाहिराती दिसायला लागतात आणि याच जाहिरातींच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळतात. या व्यतिरिक्त, युट्यूबवर पैसे कमवण्याचे आणखीही अनेक मार्ग आहेत, जसे की सुपर चॅट, सुपर थँक्स, चॅनल मेंबरशिप आणि ब्रँड कोलॅबोरेशन.

थोडक्यात, युट्यूबवरून कमाई सुरू करणे कठीण नाही, पण यासाठी संयम आणि सातत्यपूर्ण मेहनत गरजेची आहे. जर तुम्ही उत्तम कंटेंट तयार केला आणि प्रेक्षकांशी चांगला संवाद ठेवला, तर लवकरच तुमचा चॅनल मॉनेटाइज होईल आणि तुम्ही यातून चांगली कमाई करू शकाल.