शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Upcoming Smartphones: नवीन मोबाईल घेण्याआधी थांबा! मार्च 2022 मध्ये येणारे 'हे' जबरदस्त फोन्स बदलू शकतात तुमचा निर्णय

By सिद्धेश जाधव | Published: March 02, 2022 7:00 PM

1 / 5
Oppo Find X5 सीरीजमधील काही सुंदर फोन जागतिक बाजारात आले आहेत. लवकरच या सीरिजचं भारतात पदार्पण होऊ शकतं. Oppo Find X5 मध्ये Snapdragon 888 प्रोसेसर मिळतो आणि Oppo Find X5 Pro मध्ये MediaTek Dimensity 9000 चिपसेट आहे.
2 / 5
टेक दिग्गज गुगलचे खूप कमी फोन्स भारतीयांच्या नशिबी येतात. आता कंपनी लवकरच एक नवीन A-Series डिवाइस देशात सादर करू शकते. यांची माहिती Bureau of Indian Standards (BIS) वेबसाईटच्या लिस्टिंगमधून समजली आहे. हा फोन Pixel 6A असू शकतो.
3 / 5
सर्वप्रथम चीनमध्ये आलेला OnePlus 10 Pro लवकरच भारतासह जागतिक बाजारात पदार्पण करेल. हा फोन मार्च अखेरपर्यंत भारतीयांच्या भेटीला येऊ शकतो. यात सर्वात शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 48MP + 50MP + 13MP बॅक कॅमेरा सेटअप मिळेल.
4 / 5
Samsung Galaxy M33 देखील या महिन्यात सॅमसंगच्या भारतीय फॅन्सची मन जिकंण्यासाठी येऊ शकतो. लीक्सनुसार, या फोनमध्ये Exynos 1200 प्रोसेसर, 64MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि 6000mAh बॅटरी मिळू शकते.
5 / 5
बहुप्रतीक्षित Apple iPhone SE 3 देखील यंदा मार्चमध्ये लाँच होऊ शकतो. लीक्सनुसार हा एक एक 5G स्मार्टफोन असेल. या फोनमध्ये iPhone SE 2020 सारखीच डिजाइन मिळेल, परंतु चिप Apple A15 Bionic नं अपग्रेड केली जाईल.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनOneplus mobileवनप्लस मोबाईलApple Incअॅपलsamsungसॅमसंग