शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ट्विटर ब्लू टिक युजर्संना मिळणार भन्नाट फीचर्स, सर्च करताच तुमचे नाव टॉपवर येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 2:58 PM

1 / 7
इलॉन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर अनेक मोठे बदल करण्यास सुरुवात केली आहे. सर्वात पहिला ब्लू टिकला सर्वीस चार्ज लावण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला अनेकांनी विरोध केला होता,आता पुन्हा हे फिचर लाँच करण्यात आले आहे.नवे फिचर अपडेट केले आहे.
2 / 7
ट्विटरने नुकतीच सशुल्क ब्लू टिक सेवा पुन्हा सुरू केली आहे, यासाठी वापरकर्त्यांना प्रति महिना 8 डॉलर म्हणजेच सुमारे 660 रुपये शुल्क द्यावे लागणार आहेत.तर आयफोन वापरकर्त्यांसाठी ब्लू टिक शुल्क प्रति महिना 11 डॉलर म्हणजेच 908 रुपये चार्जेस द्यावे लागणार आहेत. जर वापरकर्त्यांनी ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शन खरेदी केले तर त्यांचे नाव सर्च रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर दिसमार आहे. या सेवेअंतर्गत मिळणाऱ्या फायद्यांबाबत कंपनीने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
3 / 7
ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर ब्लू टिक वापरकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल. त्यांना सामान्य ट्विटर वापरकर्त्यांपेक्षा चांगले रँकिंग मिळेल. ट्विटरवर शोध किंवा संभाषण दरम्यान ब्लू टिक वापरकर्ते पहिल्यास्थानी दिसतील. याच्या मदतीने, ब्लू टिक वापरकर्त्यांनी प्रत्युत्तर दिलेल्या ट्विटची रँकिंग वाढवेल. याशिवाय ट्विटरने ब्लू चेकमार्क वापरकर्त्यांसाठी इतर फायदे दिले आहेत.
4 / 7
ट्विटरचे सीईओ इलॉन मस्क यांनी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, ग्राहकांना उत्तरे, उल्लेख आणि शोधांमध्ये प्राधान्य मिळेल. मस्क यांच्या मते, ट्विटरवरील स्पॅम आणि घोटाळ्यांसारख्या गोष्टी दूर करण्यासाठी हे करणे आवश्यक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, 'ब्लू चेकमार्कवापरकर्त्यांना घोटाळे, स्पॅम आणि बॉट्सची उपस्थिती कमी करण्यासाठी शोध, उल्लेख आणि उत्तरांमध्ये लगेच प्राधान्य मिळेल.
5 / 7
ट्विटरवर जास्त वेळच व्हिडिओ अपलोड करण्याच्या पर्यायाची वाट पाहणाऱ्या युजर्ससाठी एक चांगली बातमी आहे. ब्लू टिक मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर जास्त वेळेचे व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत.
6 / 7
अपडेट केलेल्या पेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, आता ग्राहक 1080hp रिझोल्यूशन आणि 2GB फाइल साईजचे 60 मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ अपलोड करू शकतात. मात्र, हा व्हिडिओ कंपनीच्या नियमानुसार असावा, असे ट्विटरने स्पष्ट केले आहे.
7 / 7
याअगोदर, ट्विटर ब्लूचे वापरकर्ते 1080hp रिझोल्यूशनचे फक्त 10 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करू शकत होते. आता व्हिडिओ अपलोड करण्यासाठी 512MB पर्यंत फाइल साईजची परवानगी होती. कंपनीने ब्लू टिक सेवा पुन्हा लाँच केली आहे. सुरुवातीला ही सेवा सुरू केली तेव्हा अनेक बनावट खाती तयार करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा बंद करण्यात आली होती.
टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क