फक्त 4000 रुपयांच्या आत मिळणारे अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन TWS इयरबड्स, पहा यादी

By सिद्धेश जाधव | Published: September 9, 2021 06:19 PM2021-09-09T18:19:36+5:302021-09-09T18:37:58+5:30

दर महिन्याला ट्रू वायरलेस इयरबड्स (TWS) लाँच होत असतात. कमी किंमतीत चांगले फीचर्स देऊन सर्व ब्रॅण्ड्स एकमेकांना चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न करत आहेत. या इयरबड्समध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फिचरला जास्त मागणी आहे. आजूबाजूचा आवाज कमी करणारे हे फिचर याआधी प्रीमियम इयरबड्समध्ये मिळत होते आता हे बजेट सेगमेंटमध्ये देखील दिसू लागले आहे. पुढे आम्ही 4,000 रुपयांच्या आत उपलब्ध असलेल्या काही ट्रू वायरलेस इयरबड्सची यादी दिली आहे जे बजेटमध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन देतात.

Boat Airdopes 501(3,990 रुपये): Boat Airdopes 501 इयरबड्स 30 डेसिबल पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन देतात. यात अँबीएन्ट आणि गेम असे दोन मोड देण्यात आले आहेत. सिंगल चार्जमध्ये हे बड्स 4.5 तासांचा बॅकअप देऊ शकतात. तसेच यात ईजी इयर डिटेक्शन फिचर देखील मिळते.

Realme Buds Air 2 (3,299 रुपये): Realme Buds Air 2 कंपनीने IPX5 वॉटर रेजिस्टंन्ससह सादर केले आहेत. यात बेस बूस्ट+ सह 10mm डायमंड-क्लास ड्रायव्हर देण्यात आला आहे. 5 तासांचा बॅकअप देणारे हे बड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. या रियलमी बड्स मध्ये स्मार्ट वियर डिटेक्शन, टच कंट्रोल आणि 88ms सुपर लेटन्सी गेम मोड असे फीचर्स देखील मिळतात.

Dizo GoPods (3,299 रुपये): रियलमीच्या सब-ब्रँड डीझोमध्ये कंपनीने कस्टमाइज्ड R2 चिपसेटचा वापर केला आहे. यातील दोन मायक्रोफोन अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला मदत करतात. Dizo GoPods मधील ट्रान्स्परन्सी मोड म्युजिक सोबत बाहेरील अँबीएंट साऊंड ऐकण्यास मदत करतो. IPX5 वॉटर रेजिस्टन्ससह येणारे हे बड्स 5 तासांचा बॅकअप देतात.

Dizo GoPods Neo (2,499 रुपये): या यादीत डीझोचे हे दुसरे बड्स आहेत. Dizo GoPods Neo मध्ये कंपनीने 10mm ड्रायव्हर बेस बूस्ट+ टेक्नॉलॉजीसह दिला आहे. यात देखील अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसाठी दोन मायक्रोफोन्सचा वापर केला जातो. 5 तासांचा बॅटरी बॅकअप देणारे हे बड्स टच कंट्रोल आणि गुगल फास्ट पेयरिंगला सपोर्ट करतात.

Realme Buds Q2 (2,499 रुपये): इयरबड्सच्या बजेट सेगमेंटमध्ये रियलमी जास्तच सक्रिय आहे. Realme Buds Q2 मध्ये 25 डेसिबल पर्यंत अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन मिळते. डीझो गो बड्स प्रमाणे यात देखील ट्रान्स्परन्सी मोड आणि ड्युअल मायक्रो फोन मिळतात. चार्जिंग केसच्या मदतीने हे इयरबड्स 28 तास वापरता येतात.

Ptron Basspods 992 (1,599 रुपये): Ptron Basspods 992 मध्ये चार मायक्रोफोन देण्यात आले आहेत. म्युजिक आणि आवाज तसेच इतर फंक्शन्स कंट्रोल करण्यासाठी यात टच कंट्रोल्स देण्यात आले आहेत. वॉटर रेजिस्टन्ससह येणारे हे बड्स अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनला सपोर्ट करतात. चार्जिंग केससह 20 तासांचा बॅटरी बॅकअप देणारे हे बड्स 10 मीटरची रेंज ऑफर करतात.

टॅग्स :रियलमीrealme