Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 20:49 IST2025-10-25T20:46:27+5:302025-10-25T20:49:54+5:30

Smartphones Under 15000: कमी किंमतीत चांगला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम३६ 5G मध्ये ६.७-इंचाचा फुल HD+ (२३४०x१०८०p) डिस्प्ले आहे. यात Samsung Exynos 1380 प्रोसेसर, ६ GB RAM आणि १२८ GB स्टोरेज आहे. ५०००mAh क्षमतेची बॅटरी दीर्घकाळ वापराची हमी देते. या फोनमध्ये ५०MP + ८MP + २MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि १३MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

iQOO Z10X मध्ये ६.७२-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून १२०Hz रिफ्रेश रेट आणि १०५० nits ब्राइटनेस आहे. यात MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर, ६GB/८GB RAM आणि १२८GB/२५६GB स्टोरेज पर्याय दिले आहेत. फोनमध्ये ५०MP रियर आणि ८MP सेल्फी कॅमेरा आहे. ६५००mAh बॅटरी ४४W फास्ट चार्जिंगसह येते.

Infinix Note 50s 5G+ मध्ये ६.७८-इंचाचा फुल HD+ 3D कर्व्ह्ड AMOLED डिस्प्ले आहे, जो १४४Hz रिफ्रेश रेट आणि १३०० nits ब्राइटनेससह येतो. यात Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर, ८GB RAM आणि १२८GB/२५६GB स्टोरेज आहे. ६४MP मुख्य कॅमेरा आणि १३MP फ्रंट कॅमेरा यासह फोटोग्राफीचा अनुभव उत्कृष्ट मिळतो. ५५००mAh बॅटरी ४५W फास्ट चार्जिंग आणि १०W रिव्हर्स चार्जिंगसह येते.

Honor X7C मध्ये ६.८-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून १२०Hz रिफ्रेश रेट आणि ८५० nits ब्राइटनेस आहे. Android 14 आधारित MagicOS 8.0 वर चालणारा हा फोन ५०MP रियर आणि ५MP फ्रंट कॅमेरा सेटअपसह येतो. यात ५२००mAh बॅटरी असून ती ३५W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Tecno Pova 7 मध्ये ६.७८-इंचाचा फुल HD+ LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट १४४Hz आणि ब्राइटनेस ९०० nits आहे. Dimensity 7300 Ultimate प्रोसेसर, ८GB RAM आणि UFS 2.2 स्टोरेज यामुळे हा फोन वेगवान परफॉर्मन्स देतो. ५०MP मुख्य आणि १३MP फ्रंट कॅमेरासह हा फोन फोटोग्राफी आणि गेमिंग दोन्हीसाठी उपयुक्त आहे.