फ्लॉवर नव्हे फायर आहेत ‘हे’ फोन्स; आयफोनच्या तोडीचे सर्वात पावरफुल अँड्रॉइड मोबाईल

By सिद्धेश जाधव | Published: April 14, 2022 06:24 PM2022-04-14T18:24:31+5:302022-04-14T20:04:43+5:30

प्रत्येक स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स वेगवेगळे असतात. त्यामुळे यातील कोणता स्मार्टफोन पावरफुल आहे हे फक्त स्पेक्स बघून सांगता येत नाही. अशावेळी बेंचमार्किंग वेबसाईटचे स्कोर हे कामं सोपं करतात. आज आम्ही तुमच्यासाठी AnTuTu या बेंचमार्किंग वेबसाईटवरील मार्च 2022 मधल्या टॉप 10 अँड्रॉइड फोन्सची यादी घेऊन आलो आहोत.

Xiaomi 12 Pro हा मार्च 2022 मध्ये 9,81,496 पॉईंट्ससह पहिल्या स्थानावर आला आहे. हा फोन फेब्रुवारीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जाण्याआधी जानेवारीमध्ये देखील पहिल्या स्थानी होता. यात 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. Xiaomi 12 Pro ला Qualcomm Snapdragon 8 Gen 1 SoC कडून पावर मिळते. एप्रिलमध्ये हा फोन भारतात येणार आहे.

दुसरा क्रमांक Motorola Edge 30 Pro स्मार्टफोनला 9,78,019 पॉईंट्समुळे मिळाला आहे. या डिवाइसनं तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. Motorola Edge 30 Pro हा जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर देण्यात आला होता. फोनमध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. हा फोन भारतात उपलब्ध आहे.

Realme’s GT 2 Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह काही दिवसांपूर्वी भारतात आला आहे. 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेल्या या डिवाइसनं 9,70,727 पॉईंट्स मिळवले आहेत.

Xiaomi 12 Pro चा भाऊ म्हणजे Xiaomi 12 ला 9,51,845 पॉईंट्स मिळाले आहेत. चौथ्या क्रमांकावर असलेल्या या मोबाईलमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो.

Samsung Galaxy S22 Ulta स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह भारतात आला आहे. गेल्या महिन्यात हा डिवाइस चौथ्या क्रमांकावर होता. विशेष म्हणजे यात 12GB रॅम आणि 1TB स्टोरेज मिळते.

Samsung Galaxy S22 Ultra स्मरफोनचा Exynos 2200 प्रोसेसर असलेला मॉडेल जागतिक बाजारात आला आहे. ज्यात 12GB RAM आणि 512GB स्टोरेज मिळते. याला 9,19,689 पॉईंट्स मिळाले आहेत.

Exynos 2200 चिपसेट असलेला Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन आठव्या क्रमांकावर आहे. या मोबाईलनं अंतुतुच्या टेस्टमध्ये 8,85,440 पॉईंट्स मिळवले आहेत.

Exynos 2200 चिपसेट असलेला Samsung Galaxy S22+ स्मार्टफोन आठव्या क्रमांकावर आहे. या मोबाईलनं अंतुतुच्या टेस्टमध्ये 8,85,440 पॉईंट्स मिळवले आहेत.

OPPO Find X5 Pro स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात Snapdragon 8 Gen 1 चिपसेट, 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळते. या फोनला 8,62,584 पॉईंट्स मिळाले आहेत.

8,49,583 पॉईंट्ससह Samsung Galaxy S22 च्या Exynos व्हर्जननं दहावं स्थान मिळवलं आहे. विशेष म्हणजे या मॉडेलनं फोनच्या Snapdragon 8 Gen 1 व्हर्जनला मागे टाकलं आहे.