जनरेशन झेडचा काळ संपला! आजपासून जन्मलेली मुले ही 'जनरेशन बीटा' म्हणून ओळखली जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:06 IST2025-01-01T10:01:16+5:302025-01-01T10:06:56+5:30
Generation Beta 2025: तुम्ही रिल्स, काही लोकांच्या बोलण्यात जनरेशन झेड असा शब्द ऐकला असेल. या पिढीने जगातील तंत्रज्ञान विकसित होताना, वापरताना पाहिले आहे. यानंतर जेन जी आणि जेन अल्फा या पिढ्या आल्या. त्या अजून लहान आहेत.

आपली पिढी कोणती? एकानंतर एक अविष्कार होत गेले आणि त्या त्या काळानुसार आपल्या पिढीला एक नाव दिले गेले. आज ज्याचे वय ३५ आहे तो जनरेशन वाय म्हणून ओळखला जातो. 1997-2009 या काळातील व्यक्ती जनरेशन झेड म्हणून ओळखला जातो. जो आज टेक्नॉलॉजीवर जगत आहे. परंतू, आजपासून जन्माला येणारी पिढी नवीन जनरेशन होणार आहे. तिला या जगात जनरेशन बीटा या नावाने ओळखले जाणार आहे.
तुम्ही रिल्स, काही लोकांच्या बोलण्यात जनरेशन झेड असा शब्द ऐकला असेल. या पिढीने जगातील तंत्रज्ञान विकसित होताना, वापरताना पाहिले आहे. यानंतर जेन जी आणि जेन अल्फा या पिढ्या आल्या. त्या अजून लहान आहेत. शाळेत शिकत आहेत. परंतू, आता काळ एआयचा येऊ घातलेला आहे. या काळात जन्माला येणाऱ्या पिढीला बीटा म्हणून ओळखले जाणार आहे.
साधारणपणे कोणत्याही पिढीचे नाव त्या काळातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक घटनांच्या आधारे ठरवले जाते. एखाद्या पिढीची सुरुवात आणि शेवट त्या काळातील काही महत्त्वाच्या घटनेच्या आधारे (युद्ध, आर्थिक वाढ किंवा कोणताही मोठा तांत्रिक बदल) ठरवला जातो. या पिढ्यांचा काळ सहसा 15-20 वर्षांच्या कालावधीचा असतो.
सर्वात पहिली पिढी ही ग्रेटेस्ट जनरेशन म्हणून ओळखली जाते. याचा काळ 1901-1927 हा धरला जातो. या काळात जन्माला आलेल्या पिढीने महामंदीची झळ सोसली, या काळात जन्मलेले अधिकतर सैन्यात गेले आणि वर्ल्ड वॉर २ लढले. या लोकांनी कुटुंबाचे पालन-पोषण केले, कामावर जास्त लक्ष केंद्रीत केले. या लोकांनी आपले अनुभव, साध्य केलेल्या गोष्टी आपल्या पुढच्या पिढीकडे सोपविल्या.
द सायलेंट जनरेशन: १९२८-१९४५
महामंदी आणि दुसरे महायुद्ध यांच्या परिणामांमुळे ही पिढी द सायलेंट जनरेशन म्हणून ओळखली जाते. या पिढीतील मुले कष्टाळू आणि स्वावलंबी होती. युद्धानंतरची झळ या पिढीने झेलली, पण त्याबद्दल जास्त कुरकुर केली नाही.
बेबी बूमर पिढी: 1946-1964
दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येमध्ये प्रचंड वाढ झाली. या बदलामुळे या पिढीला बेबी बूमर्स असे नाव देण्यात आले. या पिढीने आधुनिकता स्वीकारली. बेबी बूमर्स पिढीतील लोकांनी आपल्या मुलांना नवीन पद्धतीने वाढवले.
जनरेशन X: 1965-1980
जनरेशन X साठी तंत्रज्ञान नवीन होते. इंटरनेट आणि व्हिडीओ गेम्सची सुरुवात याच काळात झाली. या पिढीतील पालकांनी आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.
मिलेनियल्स किंवा जनरेशन Y: 1981–1996
जनरेशन Y ला मिलेनिअल्स म्हणून ओळखले जाते. या पिढीतील लोकांनी सर्वाधिक बदल पाहिले आणि शिकले. या पिढीतील लोकांनी स्वतःला तंत्रज्ञानाने अपडेट केले आहे.
जनरेशन अल्फा: 2010-2024
ही पहिली पिढी आहे जिच्या जन्मापूर्वीच सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म होते. ही सर्वात तरुण नवीन पिढी आहे. या पिढीतील मुलांचे पालक इंटरनेट, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाच्या सहाय्याने मोठे झाले आहेत.
जनरेशन बीटा: 2025-2039
जनरेशन बीटा कालावधी १ जानेवारी २०२५ पासून सुरू होत आहे. 2025 मध्ये जन्माला येणाऱ्या मुलांना 'बीटा किड्स' म्हटले जाईल. ही मुले अशा जगात वाढतील जिथे तंत्रज्ञान जीवनाचा एक महत्त्वाचा भाग असेल. जनरेशन बीटाच्या जीवनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा अधिक प्रभाव पडेल.