1 / 5अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या उन्हाळी सेलमध्ये स्मार्टफोन कंपनी सॅमसंगचे नवीनतम फोन मोठ्या सवलतीत विकले जात आहेत.2 / 5सॅमसंग गॅलेक्सी एम ०६ 5G: हा बजेट स्मार्टफोन आहे. अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन २०० रुपयांच्या डिस्काऊंटसह ८ हजार २९९ रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ६.५ एचडी प्लस डिस्प्ले मिळतो. याशिवाय, या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमतेची बॅटरी मिळते.3 / 5सॅमसंग गॅलेक्सी एफ ०६ 5G: या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. हा फोन तुम्ही फ्लिपकार्ट ८ हजार ४९९ रुपये मध्ये खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली.4 / 5सॅमसंग गॅलेक्सी ए ०६ 5G: स्टायलिश आणि बेसिक 5G कनेक्टिव्हिटी असलेला फोन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी हा चांगला पर्याय आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून ९ हजार ७१० रुपये मध्ये खरेदी करू शकतात. या फोमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा कॅमरा आहे. या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी मिळते.5 / 5सॅमसंग गॅलेक्सी एम १६ 5G: या फोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी डिस्प्ले मिळत आहे. हा फोन १० हजार २४८ रुपयांत खरेदी करू शकतात. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला.