ईयरबड्स घ्यायचेत? मिळते २२ तासांची बॅटरी आणि जबरदस्त साऊंड; 'हा' ठरू शकतो बेस्ट ऑप्शन

By जयदीप दाभोळकर | Published: January 19, 2021 10:27 AM2021-01-19T10:27:26+5:302021-01-19T10:35:53+5:30

ट्रूली वायरलेस ईयरबड्स हे आजकाल सर्वांच्याच पसंतीचं गॅजेट ठरत आहे. वायर नाही त्यामुळे ते लगेच खराब होण्याची शक्यताही तितकीच कमी असते. त्यामुळे आजकाल अनेकजण ट्रूली वायरलेस ईयरबड्सना पसंती देत असतात.

स्वस्त आणि टीकाऊ ईयरबड्सकडे अनेकांचा कल असताना दिसतो. त्यातच स्कलकँडीचा हा ऑप्शन तुमच्यासाठी पर्वणी ठरू शकतो.

Skullcandy Jib True हे ट्रूली वायरलेस ईयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. २२ तासांच्या जबरदस्त बॅटरी बॅकअपसह हे हेडफोन्स उपलब्ध आहेत.

स्कलकँडी या अमेरिकन कंपनीनं Skullcandy Jib True या नव्या ईयरबड्समध्ये एडव्हान्स्ड वॉईस कॉलिंग एक्सपिरिअन्ससाठी ड्युअल मायक्रोफोन्स दिले आहेत.

Skullcandy Jib True ची भारतात किंमच २ हजार ९९९ रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

हे ईयरबड्स ब्ल्यू आणि ट्रू ब्लॅक या कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध असणार आहेत. तसंच Skullcandy च्या वेबसाईटवरूनही ते खरेदी करता येणार आहेत.

स्पेसिफिकेशन्स - Skullcandy Jib True मध्ये 20Hz-20kHz च्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्ससह ४० एमएमचे ड्रायव्हर्स देण्यात आले आहे. तसंच आवाज कमी जास्त करण्यासाठी, ट्रॅक स्किप करण्यासाठी, व्हॉईस कॉल रिसिव्ह करण्यासाठी अथवा असिस्टंट अॅक्टिव्ह करण्यासाठी कंट्रोल्सही देण्यात आले आहेत.

या ईयरबड्समध्ये ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी देण्यात आली असून ते अँड्रॉईड अथवा आयओएस डिव्हाईससह कनेक्ट करता येऊ शकतात.

याव्यतिरिक्त हे ईयरबड्स IPX4 स्वेट आणि वॉटर रेझिस्टंटदेखील आहे. तसंच ज्या व्यक्तीला दोन ईयबड्स वापरायचे नसतील त्याला एक-एक ईयरबड वापरण्याचादेखील पर्याय देण्यात आला आहे.

बॅटरी लाईफबद्दल सांगायचं झालं तर सिंगल चार्जमध्ये हे ईयरबड्स सहा तास चालू शकतात. याव्यतिरिक्त सोबत येणाऱ्या केससह १६ तासांचा अतिरिक्त बॅटरी बॅकअप मिळतो. म्हणजेच २२ तासांची बॅटरी लाईफ यासह ग्राहकांना मिळणार आहे.