8GB पर्यंत RAM असलेल्या Samsung स्मार्टफोन्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट; अशी आहे Amazon ची ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 18:14 IST2022-02-09T18:06:18+5:302022-02-09T18:14:15+5:30
Samsung Galaxy A Series चे स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेण्याची संधी Amazon देत आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन डिस्काउंटसह उपलब्ध झाले आहेत.

Samsung च्या ए सीरिजच्या स्मार्टफोन्सची किंमत मुळात खूप कमी आहे. परंतु हे स्मार्टफोन्स देखील अॅमेझॉनवर सवलतीसह उपलब्ध झाले आहेत. चला जाणून घेऊया ऑफर्स.
Samsung Galaxy A03s
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, 13MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5000mAH बॅटरी देण्यात आली आहे. 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या हँडसेटची किंमत 11499 रुपयांपासून सुरु होते.
Samsung Galaxy A12
या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले, 5000mAh ची बॅटरी आणि 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. यात Mediatek G35 प्रोसेसरसह 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन 12999 रुपयांच्या आरंभिक किंमतीत विकत घेता येईल.
Samsung Galaxy A22 5G
Samsung Galaxy A22 5G 8GB पर्यंत RAM, 128GB स्टोरेजसह बाजारात आला आहे. यात 6.6 इंचाचा डिस्प्ले, 48MP चा कॅमेरा, MediaTek MT6833V प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी मिळते. किंमत 19999 रुपयांपासून सुरु होते.
Samsung Galaxy A22 5G
Samsung Galaxy A22 5G अॅमेझॉनवरून विकत घेताना बँक ऑफ बडोदा आणि Axis Miles च्या कार्डवर 10 टक्के सूट मिळेल. तसेच फोनवर 14950 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर आहे.
Samsung Galaxy A52s 5G
हा 5G स्मार्टफोन 64MP कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. ज्यात 6.5 इंचाचा डिस्प्ले, 4500mAh ची बॅटरी, 8GB पर्यंत RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. 35999 रुपये देऊन फोनचा बेस व्हेरिएंट मिळेल.