आला रे आला... शाओमीचा 'रेड वेरियंट स्मार्टफोन' आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 15:56 IST2018-09-04T15:43:54+5:302018-09-04T15:56:16+5:30

चीन स्मार्टफोन कंपनी शाओमी रेड मी नोट 5 चा रेड वेरियंट हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

शाओमीच्या वेबसाईटवरुन रेड मी नोट प्रोच्या स्मार्टफोनची विक्री सुरु झाली आहे.

लवकरच हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरही उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनमध्ये ओरिजनल Redmi Note 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहे.

Redmi Note 5 Pro मध्ये 5.99 फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनचा एक्सपेस्ट रेशो 18:9 आहे. या स्मार्टफोनच्या वेरिएंट मध्ये स्वतंत्र मेमरीचा पर्याय आहे.

स्मार्टफोनमध्ये 3GB रॅमसह 32GB मेमरी, 4GB रॅमसह 64GB ची मेमरी आणि 6GB रॅमसह 64GB मेमरीचा पर्याय आहे.