फोन खूप स्लो चार्ज होतो? 'ही' आहेत कारणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 16:29 IST2019-08-03T16:22:13+5:302019-08-03T16:29:04+5:30

फोनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळेच बॅटरी लवकर लो होते. फोन चार्ज करण्यासाठी चार्जरचा वापर हा प्रामुख्याने केला जातो. मात्र कधी कधी फोन स्लो चार्ज होतो. त्यामागे अनेक कारण असतात. ही कारणं जाणून घेऊया.

चार्जर बदला
चार्जर खराब असल्यामुळे फोन अनेकदा चार्ज होत नाही. अशा वेळी फोनसोबत येणारी केबल आणि अॅडप्टरच्या मदतीने फोन चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो. ओरिजनल चार्जरची खरेदी करा.

वीक पॉवर सोर्स
स्लो चार्जिंगसाठी नेहमी चार्जर जबाबदार असतो असं नाही. अनेकदा पॉवर सोर्स वीक असल्याने फोन स्लो चार्ज होतो.

खराब बॅटरी
फोनची बॅटरी खराब झाल्यामुळे काही वेळा फोन स्लो चार्ज होतो.

डॅमेज यूएसबी पोर्ट
यूएसबी पोर्ट डॅमेज झालं असल्यास फोन स्लो चार्ज होतो. अशावेळी ते बदला.

बॅकग्राऊंड अॅप
फोन स्लो चार्ज होण्यासाठी काही वेळा बॅकग्राऊंड अॅप देखील जबाबदार असतात. फोनमध्ये एखादं नवीन अॅप डाऊनलोड केल्यानंतर फोन स्लो झाला असेल तर ते अॅप लगेच अनइन्स्टॉल करा.

















