जबरदस्त फीचर्स असलेले Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच, पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

By जयदीप दाभोळकर | Published: February 4, 2021 04:32 PM2021-02-04T16:32:15+5:302021-02-04T16:43:54+5:30

रिअलमीनं आज भारतात आपले दोन नवे स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लाँच केले. Realme X7 चा सेल १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.

तर Realme X7 Pro चा सेल १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल.

हे दोन्ही फोन ग्राहकांना रिअलमीच्या वेबसाईटवरून किंवा फ्लिपकार्ट वरून खरेदी करता येतील.

लाँच ऑफर अंतर्गत कंपनी आणखी काही ऑफर्स देण्याच्या तयारीत आहे. याव्यतिरिक्त ज्या ग्राहकांकडू ICICI बँकेचं क्रेडिट कार्ड असेल त्यांना २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे.

तर ज्या ग्राहकांकजे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल त्या ग्राहकांना १ हजार ५०० रूपयांची सूट देण्यात येईल.

तर ज्या ग्राहकांकजे अॅक्सिस बँकेचं क्रेडिट कार्ड असेल त्या ग्राहकांना १ हजार ५०० रूपयांची सूट देण्यात येईल. Realme X7 च्या 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 19 हजार 999 रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

तर 8 जीबी आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 21 हजार 999 रूपये आहे.

तर दुसरीकडे Realme X7 Pro बाबत सांगायचं झालं तर हा फोन 8 जीबी 128 जीबी एका सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. याची किंमत 29 हजार 999 रूपये इतकी आहे.

Realme 7 5G मध्ये डायमेंसिटी 800U 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर 7nm प्रोरेसरवर बेस्ड आहेत.

याव्यतिरिक्त या फोनचं वजन 176 ग्राम असून यात 120 हर्ट्झचा 6.5 इंचाचा सुपर अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या स्मार्टफोनमध्ये Mali G57 हा जीपीयू वापरण्यात आला आहे.

बॅटरी क्षमतेबाबत सांगायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसंच हा फोन 30 वॉट सुपरडार्ट चार्ज सपोर्ट करेल. दरम्यान, हा फोन 65 मिनिटांमध्ये फुल चार्ज होणार असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून या ४८ मेगापिक्सेलचा मेन कॅमेरा सेन्सर, याव्यतिरिक्त ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल आणि २ मेगापिक्सेलचा मायक्रो कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme X7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यात 8nm बेस्ड क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G हा गेमिंग प्रोसेसर आहे.

याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा इनडिस्प्ले सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून मागील बाजूला सोनी 64 मेगापिक्सेलसह क्वाड कॅमेरा सेटअपही देण्यात आलं आहे.

तसंच हा मोबाईल 65W सुपर डार्ट चार्जिंगही सपोर्ट करणार असून हा मोबाईल 34 मिनिटांत पूर्ण चार्ज होत असल्याचा दावा कंपनीनं केला आहे.

Read in English