Realme: आवाज ऐकताच फोटो एडीट करून देईल रिअलमीचा 'हा' फोन, लवकरच बाजारात करतोय एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:26 IST2025-07-08T16:22:44+5:302025-07-08T16:26:39+5:30

Realme 15: रिअलमीचा बहुचर्चित स्मार्टफोन रिअलमी १५ लवकरच स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे.

बहुचर्चित असलेल्या रिअलमी १५ मालिका बाजारात कधी दाखल होईल, याबाबत कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. कंपनीचे दोन नवे स्मार्टफोन रिअलमी १५ 5G आणि रिअलमी १५ प्रो 5G येत्या २४ जुलै २०२५ रोजी बाजारात दाखल होणार आहे.

रिअलमी १५ प्रो 5G मध्ये नवीन कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे फोनला खास लूक मिळतो. लॉन्चिंगआधीच या स्मार्टफोनचे फोटो आणि अधिकृत पोस्टर्सवरून दिसत आहे की, या स्मार्टफोनची जाहीरात बॉलिवूड अभिनेता विकी कौशल करणार आहे.

हा फोन फोन व्हेल्व्हेट ग्रीन, सिल्क पिंक आणि सिल्क पर्पल अशा आकर्षक रंगामध्ये लॉन्च केला जाईल, जो तरूणांना लक्षात घेऊन डिझाइन केला गेला आहे, असे म्हटले जात आहे.

कंपनीने स्पेसिफिकेशनबाबत अधिकृत माहिती घोषणा केली नाही. परंतु, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ जनरेशन ४ प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे.

हा फोन ६ जीबी रॅम, ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅमसह बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.