शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

QR Code Payment: जेवढे सोयीचे, तेवढेच धोक्याचे! क्यूआर कोड स्कॅन करताना सावध; खाते रिकामे होण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 1:02 PM

1 / 7
क्यूआर कोड स्कॅन करून पटापट खरेदी करण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. अगदी छोट्यातील छोटी रक्कमही क्यूआर कोड स्कॅन करून अदा केली जात आहे. पण यातील धोकाही तेवढाच असून, त्याबाबत सावध न राहिल्यास खाते रिकामे होण्याची शक्यता आहे. या कामात तरबेज असणारे हॅकर अगदी काही मिनिटांत तुमचे बँक खाते रिकामे करू शकतात.
2 / 7
आपण जर सावध नसाल आणि ज्या ठिकाणी पैसे देण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन केला तर बॅंकेतून सगळीच रक्कम जाऊ शकते.
3 / 7
हॅकरद्वारे असे क्यूआर कोड तयार केले जातात. त्यासाठी सावध राहून पेमेंट करावे लागते.
4 / 7
पैसे घेण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करू नका. तुम्हाला पैसै घ्यायचे असल्यास रोख घ्या किंवा इतर माध्यमातून घ्या. कारण पैसे घेण्यासाठी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करण्याची कधीच गरज नसते.
5 / 7
एखादा व्यक्ती तुम्हाला पैसे स्वीकारण्यासाठी एखादा क्यूआर कोड स्कॅन करायला सांगत असेल, तर तसे अजिबात करू नका. यामागे फ्रॉड दडलेले असू शकते.
6 / 7
सध्या शॉपिंगवेळी, भाजीच्या दुकानात किंवा मग कोणत्याही दुकानात रोख पैसे अदा करण्याऐवजी क्यूआर कोड स्कॅनच्या माध्यमातून पेमेंट करणे अधिक पसंत करू लागलो आहोत.
7 / 7
क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर ज्या व्यक्तीला पेमेंट करणार आहोत त्याच्याशी संबंधित क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर आपण कोणत्या नावावर पेमेंट करत आहोत, त्याची माहिती दाखवली जाते. त्याची खातरजमा करूनच पिनकोड टाकावा.