शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...

By हेमंत बावकर | Updated: October 14, 2025 14:25 IST

1 / 11
बीएसएनएलने नुकतेच फोरजी नेटवर्क लाँच केले आहे. काही महिन्यांत ५ जी देखील लाँच करू असे सरकार सांगत आहे. फोरजी आले तरी बीएसएनएलची सेवा काही सुधरलेली दिसत नाहीय. कॉल न लागणे, लागलाच तर ऐकू न येणे, सुदैवाने हे दोन्ही झालेच तर कॉलच मध्येच कट होणे असे अनेक प्रकारचे त्रास बीएसएनएल ग्राहकांना भोगावे लागत आलेले आहेत. हे गेल्या दोन-चार वर्षांतले नाहीतर २०-२० वर्षे सुरुच आहे.
2 / 11
इंटरनेट स्पीडचे तर विचारायलाच नको, कधी 4G वरून H होईल आणि त्या H चे कधी E होईल कोणीच सांगू शकत नाही. साधे युपीआय पेमेंट करणेदेखील अनेकदा कठीण होऊन बसते. यालाच वैतागून एका ग्राहकाने २० वर्षांची बीएसएनएलची साथ सोडून इतर कंपन्यांमध्ये पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 11
या ग्राहकाचा पोर्ट करण्याचा अनुभव तर भारीच आहे. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोर्ट करण्यासाठी १९०० वर PORT (10 अंकी मोबाईल नंबर) असा एसएमएस पाठवावा लागतो. मग तुमची जुनी कंपनी तुम्हाला फोन करते आणि का सोडून चालला आहात असे विचारते. या ग्राहकाला बीएसएनएलकडून फोन आला पण तो सुद्धा नीट ऐकू येत नव्हता, एवढी वाईट सेवा मिळत आहे.
4 / 11
पोर्ट रिक्वेस्ट केल्यानंतर जुनी कंपनी एक UPC कोड देते. तो कोड तुम्हाला नव्या कंपनीला द्यायचा असतो. हा कोड मिळविण्यासाठी या ग्राहकाला २-४ वेळा १९०० वर PORT असे मेसेज पाठवावे लागले आहेत. तेव्हा कुठे त्याला हा कोड मिळाला आहे.
5 / 11
हा ग्राहक गेल्या वीस एक वर्षांपासून बीएसएनएलची सेवा वापरत आहे. याच नंबरवर आधार, पॅन, बँकांचे ओटीपी येतात. परंतू, ते येण्यासही अनेकदा विलंब होतो किंवा येतच नाहीत अशी अवस्था होती. आजकाल प्रत्येक गोष्ट मोबाईलवर आलेली आहे. अशा काळात जर साधा ओटीपी वेळेत येत नसेल तर बीएसएनएलची सेवा कशी वापरावी, असा प्रश्न या ग्राहकाला पडला होता.
6 / 11
कोणाला फोन जरी लावायचा म्हटला तरी आधी लागेल का, असा प्रश्न मनात येत होता. लागला तर सर्वात आधी हॅलो, ऐकायला येतेय का? असे विचारावे लागत होते. पाऊस पडला की ग्रामीण भागात रेंजच गेली म्हणून गृहीत धरायचेच. एवढी वर्षे ग्रामीण भागात रेंज मिळेल म्हणून हा नंबर बीएसएनएलमध्येच ठेवला होता. परंतू, आता ती देखील आशा सोडावी लागली आहे. शहरात तर विचारूच नका...
7 / 11
अखेरीस या ग्राहकाने बीएसएनएलची साथ सोडण्याचा निर्णय घेत खासगी कंपनीच्या सेवेसाठी जास्त पैसे मोजून पोर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. फोरजी आल्यावर तरी सेवा सुधारेल असे वाटले होते, यामुळे आता फोरजी येईल, उद्या येईल या आशेने हा ग्राहक गेली काही वर्षे थांबला होता. आता बास झाले, म्हणत त्याने हा निर्णय घेतला आहे.
8 / 11
अनेकजण विचार करतात रिचार्ज स्वस्त आहेत. खासगी कंपन्यांची २५०, ३०० च्या पुढेच महिन्याची रिचार्ज आहेत. बीएसएनएल २०० रुपयांत २८ दिवस व्हॅलिडीटी देते. १ जीबी डेटा देते. परंतू, जर सेवेचा हिशेब घातला तर ते २०० रुपयेही वायाच गेल्यासारखे आहेत.
9 / 11
रेंज, इंटरनेट आदी सेवाच मिळत नसेल तर २०० रुपये वायाच गेल्यासारखे नाहीत का? त्यापेक्षा थोडे जास्त पैसे खर्च करून २५०, ३०० रुपयांची रिचार्ज केली तर महिनाभर निदान चांगली सेवातरी अनुभवता येते. फोन कट झाला, ऐकू आले नाही तर निदान जी चिडचिड होते ती तरी होत नाही. शिवाय आपल्याला जे महत्वाचे सांगायचे आहे किंवा जे महत्वाची चर्चा आहे ती देखील होते.
10 / 11
पुण्यासह राज्यभरात, देशभरात बीएसएनएलचे फोरजी आले आहे. परंतू, म्हणावा तसा स्पीड मिळत नाहीय. पुण्यात १०-१२ एमबीपीएसचा स्पीड मिळत आहे. गावाकडे थोडा जास्त असेल. परंतू, इतर कंपन्यांच्या ४जी च्या तुलनेत तो देखील कमी आहे. १००-१५० रुपये जास्त मोजले तर शेकडो एमबीपीएसचा स्पीड तुमच्या हातातील मोबाईलला मिळत आहे.
11 / 11
अनेकांकडे दोन सिमकार्ड असतात. बीएसएनएलचे सिमकार्ड हा जुना नंबर असतो. तो सुरु ठेवायचा म्हणून १५३-१९९ रुपयांचे रिचार्ज करून ठेवता येते. दुसरा नंबर हा इतर कंपन्यांचा असतो. हा एकूण खर्च ५०० रुपयांच्या आसपास जातो. किंवा ज्यांचे उत्पन्न कमी आहे, त्यांच्यासाठी बीएसएनएल चांगला नाही परंतू ठीकठाक पर्याय ठरू शकतो.
टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलReliance Jioरिलायन्स जिओVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)