शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OnePlus 7T भारतात लाँच; ट्रिपल रिअर कॅमेरासह बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:28 PM

1 / 8
चीनची प्रिमिअम स्मार्टफोन कंपनी वनप्लसने आज OnePlus 7T भारतात लाँच केला. या मोबाईलमध्ये कंपनीने ट्रिपल रिअर कॅमेरा दिला असून क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 855+ हा अद्ययावत प्रोसेसर दिला आहे. तसेच चार्जिंगही सर्वात वेगवान असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
2 / 8
कंपनीने OnePlus Pay ही पेमेंट सुविधाही वनप्लसच्या ग्राहकांसाठी सुरू केली आहे.
3 / 8
OnePlus 7T मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजची किंमत 37999 रुपये आणि 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन ग्लेशियर ब्लू आणि फ्रॉस्टेड सिल्व्हर रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. 28 सप्टेंबरपासून हा फोन अॅमेझॉनवर विक्रीला उपलब्ध होणार आहे.
4 / 8
6.55 इंचाचा AMOLED डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फ्लुइड डिस्प्ले टेक्नॉलॉजी आणि 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यामुळे स्मूथ फंक्शन होण्याचा दावा कंपनीने केला आहे. Android 10 ही मिळणार आहे. अॅनिमेशन ऑप्टीमायझेशन मिळणार आहे.
5 / 8
फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सल प्रायमरी 12 मेगापिक्सलची 2x टेलिफोटो लेन्स आणि 16 मेगापिक्सलचा 117 डिग्री अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे.
6 / 8
सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
7 / 8
वनप्लस 7टी मध्ये 3,800mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 30 वॉटचे व्रॅप चार्जिंग देण्यात आले आहे.
8 / 8
फोनची जाडी केवळ 8.1 मीमी एवढी असल्याने आणि मॅट-फ्रॉस्टेड ग्लास पॅटर्नमुळे फोन आकर्षक वाटतो.
टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईल