शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एसबीआय डेबिट कार्ड कायमचे बंद करणार; मग पैसे कसे काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:15 AM

1 / 8
भविष्यात प्लॅस्टिकचे डेबिट कार्ड इतिहासात जमा होणार आहेत. भारताची सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक भविष्यात डेबिट कार्ड बंद करण्याच्या विचारात आहे.
2 / 8
स्टेट बँकेने एक योजना बनविली आहे. ही योजना सफल झाल्यास लवकरच ग्राहकांची डेबिट कार्ड रद्द होतील. याबाबतची माहिती बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी दिली आहे.
3 / 8
त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, आमची योजना डेबिट कार्डला वापरातून बाहेर करण्याची आहे. आम्ही डेबिट कार्ड कायमची बंद करू शकतो. भारतात सध्या 90 कोटी डेबिट कार्ड आणि तीन कोटी क्रेडीट कार्ड आहेत.
4 / 8
एसबीआय डिजिटल प्रणाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर एसबीआयने 'योनो' प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. योनोमुळे देश कार्ड मुक्तीकडे वाटचाल करेल.
5 / 8
योनोद्वारे एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. तसेच कोणत्याही दुकानातून डिजिटली पैसे अदा करून सामान खरेदी करता येणार आहे.
6 / 8
बँकेने आधीच 68 हजार 'योनो कॅशपॉइंट' उभे केले आहेत. पुढील 18 महिन्यांत ही संख्या तब्बल 10 लाखांवर जाणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.
7 / 8
स्टेट बँकेने यंदा मार्चमध्ये योनो कॅश सेवा सुरू केली आहे, जी ग्राहकांना डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सोय देत आहे. ही प्रक्रिया खूप सोपी आणि सुरक्षित आहे.
8 / 8
सुरुवातीला ही सुविधा 16,500 एटीएममध्ये उपलब्ध करण्यात आली होती. बँकेने आता याची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
टॅग्स :SBIएसबीआयatmएटीएमdigitalडिजिटल