जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 02:05 PM2019-05-16T14:05:33+5:302019-05-16T14:24:01+5:30

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. युजर्स मेसेज, फोटो, व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपवरून आपल्य़ा नातेवाईकांना अथवा मित्रमैत्रिणींना पाठवून त्यांच्याशी कनेक्ट होत असतात. या अ‍ॅपमधील अनेक फीचर्समुळे युजर्सच्या चॅटची गंमत आणखी वाढते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काही सिक्रेट फीचर्स आहेत. अशाच भन्नाट सिक्रेट फीचर्सबाबत जाणून घेऊया.

एखाद्या खास चॅटची मीडिया फाईल हाईड करण्यासाठी Media Visibility हे बेस्ट फीचर आहे. यासाठी त्या कॉन्टॅक्टच्या इन्फोमध्ये जाऊन Media Visibility या पर्यायावर क्लिक करणं गरजेचं असणार आहे. क्लिक केल्यावर Default(Yes), Yes आणि No असे तीन पर्याय मिळतील. यामधील NO वर क्लिक करा. यानंतर या खास चॅटची कोणतीही मीडिया फाईल तुमच्या फोन गॅलरीमध्ये सेव्ह होणार नाही.

व्हॉट्सअ‍ॅपवर आपण कामासाठी अनेक ग्रुपमध्ये अ‍ॅड असतो. मात्र त्यावर सातत्याने येणाऱ्या मेसेजचा कंटाळा येतो. अशावेळी Mute Group Chat हे फीचर अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी ग्रुप चॅटमध्ये जाऊन 'Mute Chat' या पर्यायावर क्लिक करा. येथे 8 तासांपासून 1 वर्षापर्यंत एखादा ग्रुप म्यूट करता येतो.

Disable Blue Tick हे फीचर युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले आहे. ब्लू टिकवरून मेसेज वाचला आहे की नाही हे समजण्यास मदत होते. सेटींगमध्ये जाऊन अकाऊंटवर क्लिक करा. यामध्ये प्रायव्हसी या पर्यायावर क्लिक करा. रीड रीसीटचा एक पर्याय दिसेल तो डिसेबल करा म्हणजे त्यानंतर तुम्ही मेसेज वाचला की नाही कोणालाच कळणार नाही.

WhatsApp Group Video Call हे सर्वच युजर्सचं अत्यंत आवडतं फीचर आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स एकाचवेळी त्यांच्या चार मित्रमैत्रिणींशी आणि नातेवाईकांशी संवाद साधू शकतात.

युजर्सना लास्ट सीन हाईड करायचा असल्यास Hide Last Scene या फीचरचा खूप उपयोग होतो. यासाठी सेटींगमध्ये जाऊन अकाऊंट या पर्यायावर क्लिक करा. तिथे लास्ट सीन हा पर्याय दिसेल. त्यामध्ये Nobody हा पर्याय सिलेक्ट करा. म्हणजे तुम्ही लास्ट टाईम कधी ऑनलाईन होता हे इतरांना समजणार नाही.

युजर्सना असं वाटत असेल की कोणलाच आपल्याबाबत काहीच समजू नये तर सेटींगमध्ये जाऊन प्रायव्हसीमध्ये जा. येथे युजर्सना प्रोफाईल, फोटो, अबाऊट आणि स्टेटसचा पर्याय दिसेल. त्यामध्ये Nobody वर क्लिक करा.

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये असलेल्या ग्रुपच्या एखाद्या अ‍ॅडमिनचं वर्तन आवडलं नाही तर त्याला अ‍ॅडमिन या पदावरून हटवण्याचा युजर्सना अधिकार आहे. यासाठी ग्रुप इन्फोमध्ये जाऊन त्या व्यक्तीच्या नावावर थोडा वेळ प्रेस करा. त्यानंतर Dismiss as Admin हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

Share Live Location या फीचरच्या मदतीने लोकेशन शेअर करण्यात येते. या फीचरचा वापर करण्यासाठी चॅट बॉक्सच्या अटॅचमेंट मेन्यूवर जा. तिथे शेअर लोकेशन हा पर्याय दिसेल तेथून लोकेशन पाठवू शकता.

दिवसभर युजर्स अनेक लोकांशी चॅट करत असतात. यामध्ये दिवसभरात कोणाशी सर्वाधिक चॅट केलं हे देखील व्हॉट्सअ‍ॅपमध्ये समजतं. यासाठी चॅटच्या सेटींगमध्ये जाऊन डेटावर क्लिक करा. यानंतर युजर स्टोरेजचा पर्याय ओपन होईल त्यामध्ये कॉन्टॅक्ट्स आणि ग्रुप रँकींग दिसेल. त्यामुळे सर्वात जास्त कोणासोबत चॅट केलं हे समजण्यास मदत होईल.