12 GB रॅम अन् 512 GB स्टोरेज; या फोल्डेबल फोनवर मिळतोय 35,000 चा डिस्काउंट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 18:56 IST2025-06-29T18:48:04+5:302025-06-29T18:56:14+5:30
Motorola Razr 50 ultra: नवीन फोन घेण्याचा विचार करताय? मग ही संधी गमावू नका.

Motorola Razr 50 ultra: नवीन फोन घेण्याचा विचार करताय? मग ही संधी गमावू नका. प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Motorola च्या फोल्डेबल स्मार्टफोनवर तब्बल 35,000 रुपयांचा डिस्काउंट मिळतोय. ई-कॉमर्स साइट Flipkart वरुन तुम्ही हा Motorola Razr 50 ultra फोल्डेबल फोन स्वस्तात खरेदी करू शकता.
Motorola Razr 50 ultra (12 जीबी रॅम + 512जीबी स्टोरेज) व्हेरिएंटची किंमत लॉन्चच्या वेळी 99,999 रुपये होती. पण, आता हा फ्लिपकार्टवर फक्त 68,490 रुपयांना मिळतोय. म्हणजेच, तो लॉन्चिंग किमतीपेक्षा 31,509 रुपयांनी कमी किमतीत खरेदी करता येईल.
तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 4,000 रुपयांची अतिरिक्त सूटदेखील मिळू शकते. त्यानंतर या फोनची किंमत 64,490 रुपये होते. अशा रितीने तुम्हाला हा स्मार्टफोन 35,509 रुपयांपर्यंत कमी किमतीत खरेदी करू येईल.
Motorola Razr 50 ultra मध्ये 6.9 इंचाचा मोठा FHD+ pOLED डिस्प्ले आहे, जो आजच्या बहुतांश फोनच्या स्क्रीनपेक्षा मोठा आहे. ही स्क्रीन 120 टक्के DCI-P3 कलर गॅमटला सपोर्ट करते. कव्हर स्क्रीनप्रमाणे रिफ्रेश रेट देखील 165 Hz आहे.
आतील स्क्रीनवर टच रिस्पॉन्स 360Hz असून, त्याची ब्राइटनेस 3,000 निट्सपर्यंत जाऊ शकते. फोटो काढण्यासाठी फोनमध्ये 32-मेगापिक्सेल सेल्फीकॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, 50-मेगापिक्सेल f/1.7 मेन कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल f/2.0 टेलिफोटो सेन्सर आहे.
यात 4,000 mAh बॅटरी आहे. ही 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय, 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टदेखील आहे. Motorola Razr 50 ultra IPX8 रेटिंगसह येतो.