शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक रिल्स बनवणार करोडपती! घरबसल्या दरमहा कमवा २.८० लाख रुपये; जाणून घ्या कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 13:51 IST

1 / 7
फेसबुकने आता कंटेट क्रिएटर्संना आनंदाची बातमी दिली आहे. फेसबुकने 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' प्रोग्रॅम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश क्रिएटर्सना पैसे कमवण्याची संधी देणे हा आहे. या माध्यमातून क्रिएटर्सना हमीपूर्वक पैसे मिळवून देईल आणि त्यांच्या कंटेंटची पोहोच वाढवेल, यामुळे त्यांना फेसबुकवर अधिक वेगाने प्रगती करण्यास मदत होणार आहे.
2 / 7
सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही एक मोठी संधी असून, या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश क्रिएटर्सना आर्थिक सक्षम बनवणे हा आहे. या उपक्रमांतर्गत केवळ उत्पन्नाची खात्रीच दिली जात नाही, तर क्रिएटर्सच्या कंटेंटचा रिच वाढवण्यासाठीही विशेष मदत केली जाणार आहे.
3 / 7
फेसबुकने आपल्या नव्या धोरणाबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'इतर प्लॅटफॉर्मवर यशस्वी झालेल्या क्रिएटर्सना फेसबुकवर शून्यापासून सुरुवात करणे अनेकदा कठीण जाते. त्यांचे हे आव्हान लक्षात घेऊनच आम्ही 'क्रिएटर फास्ट ट्रॅक' प्रोग्राम लाँच केला आहे.
4 / 7
' या कार्यक्रमामुळे प्रस्थापित क्रिएटर्सना फेसबुकवर आपले स्थान निर्माण करणे आता पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे होणार आहे. विशेष म्हणजे, या प्रोग्राममध्ये सहभागी होणाऱ्या क्रिएटर्सच्या 'रील्स'चा रिच कंपनी स्वतः वाढवणार आहे, यामुळे त्यांचे फॉलोअर्स झपाट्याने वाढण्यास मदत होईल. इतकेच नव्हे, तर फेसबुकवर एलिजेबल रील्स शेअर केल्याबद्दल संबंधित क्रिएटर्सना पुढील तीन महिन्यांसाठी एक ठराविक पेमेंट देखील दिले जाणार आहे.
5 / 7
या उपक्रमात सहभागी होणारे क्रिएटर्स, जर त्यांचे इंस्टाग्राम, टिकटॉक किंवा यूट्यूबवर किमान १,००,००० फॉलोअर्स असतील तर दरमहा १,००० डॉलर (अंदाजे रु. ९३,३९७) कमवू शकतात, किंवा जर त्यांचे यापैकी किमान एका प्लॅटफॉर्मवर दहा लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर दरमहा ३,००० डॉलर (अंदाजे रु. २,८०,१९३) कमवू शकतात.
6 / 7
हा कार्यक्रम क्रिएटर्सना फेसबुक कंटेंट मॉनेटायझेशन करुन देते, यामुळे त्यांना आणखी जास्त कमाई करता येते आणि क्रिएटर फास्ट ट्रॅक प्रोग्राम संपल्यानंतरही ते त्यांच्या एलिजेबल कंटेंटमधून कमाई सुरू ठेवू शकतात.
7 / 7
फेसबुक, क्रिएटर्संना त्यांच्या समुदायांशी जुळणारा कंटेंट तयार करून त्यांच्या कामातून पैसे कमविण्यात मदत करण्यासाठी अधिक गुंतवणूक करत आहे. २०२५ मध्ये, फेसबुक आपल्या 'क्रिएटर मॉनेटायझेशन प्रोग्राम'द्वारे कंटेट निर्मात्यांना जवळपास ३ अब्ज डॉलर्स देईल. ही रक्कम मागील वर्षाच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी अधिक असून, आतापर्यंतची सर्वाधिक वार्षिक रक्कम आहे.
टॅग्स :MetaमेटाFacebookफेसबुक