...तर पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय?; चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:21 AM2021-04-20T09:21:38+5:302021-04-20T09:29:14+5:30

WhatsApp News : व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊ या...

व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हाव म्हणून व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं.

भारतासह जगभरात व्हॉट्सॲपचे कोट्यवधी युजर्स आहेत. दिवसभरात या युजर्सकडून व्हॉट्सॲपचा यथेच्छ वापर होत असतो. मेसेज देवाणघेवाणीपासून फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, कार्यालयीन कामकाजाचे रिपोर्ट्स या सगळ्यांचा त्यात समावेश असतो.

व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊ या...

व्हॉट्सॲपचा बॅकग्राऊंड रंग हिरवा आहे. हा रंग बदलून तो पिंक करायचे असेल तर व्हॉट्सॲप पिंक नावाची लिंक येते. हे व्हॉट्सॲपचे नवीन फीचर असल्याचा उल्लेखही या लिंकमध्ये असतो. अर्थातच ही लिंक क्लिक करण्याचा मोह वापरकर्त्याला होतो.

व्हॉट्सॲप पिंक ही लिंक क्लिक केली की युजर्सचा फोन हॅक होतो. सध्या सोशल मीडियावर हा मेसेज तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेज पासून अत्यंत सावध राहण गरजेचं आहे.

संपूर्ण फोन हॅक होतो. तुमचे काँटॅक्ट नंबर्स, फोटो, मेसेजेस, बँक डिटेल्स हे सगळे हॅकर्सला मिळेल. युजर्सची वैयक्तिक माहिती ही हॅकर्सला मिळते आणि ते त्याच्या जाळ्यात अडकतात.

युजर्सनी अशा कोणत्याही फेक लिंकला क्लिक न केलेलेच बरे. तसेच मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही एपीके वा तत्सम मोबाईल ॲप डाऊनलोड करू नये.

व्हॉट्सॲपने अशा प्रकारची कोणतीही लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका. आम्ही असे कोणतेही फीचर लाँच केलेले नाही. तसेच ज्या युजर्सना अशा प्रकारची लिंक येईल, त्यांनी आमच्याकडे त्याचा रिपोर्ट पाठवावा असं म्हटलं आहे.

पिंक रंगाचं व्हॉट्सॲप या व्हायरल होणाऱ्या मेसेज आणि लिंकला भूलू नका असाच सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच कोणत्याही मेसेसची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका असं सांगण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकदा आपण एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मेसेज हे स्टेटसला ठेवत असतो. अनेकदा इतरांनी ठेवलेले स्टेटस हे आपल्या प्रचंड आवडतात. खासकरून व्हिडीओबाबत हे हमखास होत असतं. मात्र ते व्हिडीओ 24 तासांनंतर निघून जातात आणि आपल्या ते आपल्या फोनमध्येही ठेवता येत नाहीत. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी एक खूशखबर आहे.

कोणत्याही थर्ड पार्टी App ची गरज न घेता आता WhatsApp व्हिडीओ स्टेटस सहज डाऊनलोड करता येणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस कसं ठेवायचं हे सर्वांनाच माहीत आहे पण ते डाऊनलोड कसं करायचं हे फार कमी लोकांना माहीत आहे.

WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मित्रमैत्रिणींच्या स्टेट्सपैकी एखादा फोटो किंवा व्हिडीओ आपल्याला हवा असेल तर ते त्यांच्याकडे मागावं लागतं. पण एक पद्धत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सहज WhatsApp स्टेट्सला डाऊनलोड करू शकता.

सर्वप्रथम व्हिडीओ स्टेट्सला ओपन करा हे तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. यानंतर फोनच्या फाइल मॅनेजरमध्ये जा. हे प्रत्येक फोनमध्ये इनबिल्ट असतात. जर तुमच्या फोनमध्ये हे नसेल तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा. फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्ये जा.

Show Hidden System Files सेटिंगला ऑन करा. मग पुन्हा फाइल मॅनेजरच्या होम पेजवर या. या ठिकाणी फोनची इंटरनल मेमरीचा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर जा. WhatsApp फोल्डरच्या मीडिया फोल्डरला ओपन करा.

या ठिकाणी तुम्हाला स्टेस्ट फोल्डर दिसेल. यात सर्व WhatsApp स्टेट्स दिसतील. ज्याला तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे. त्याला सिलेक्ट करून कॉपी करा. आणि इंटरनल स्टोरेजमध्ये पेस्ट करा. यानंतर स्टेट्सला तुम्ही कुणालाही सेंड करू शकता.