शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पॉर्न अ‍ॅडिक्टने दुसऱ्यांची 'ही' सवय सोडवण्यासाठी बनवलं अ‍ॅप, आता कोट्यावधींची कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 4:29 PM

1 / 9
पोर्नच्या वाईट व्यसनातून खूप त्रस्त झालेल्या एका तरूणाने असे कृत्य केले आहे, ज्यामुळे तुम्ही त्याचे कौतुक कराल. पॉर्न पाहण्याची सवय सोडून देण्यासाठी या तरूणाने आपल्या संघर्षाच्या अनुभवातून असे अ‍ॅप लॉन्च केले आहे, जे आता 90 दिवसांच्या आत या व्यसनापासून ग्रस्त असलेल्या इतर लोकांनाही पोर्न पाहण्याची सवय सोडवू शकेल.
2 / 9
जॅक जेनकिन्स नावाच्या या तरुणाला पॉर्न पाहण्याची वाईट सवय होती, यामुळे त्याचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते. जॅक जेनकिन्सने ही सवय सोडण्याची शपथ घेतली.
3 / 9
जॅक जेनकिन्सने आपल्या भूतकाळाबद्दल सांगितले की, 'हे व्यसन माझे आयुष्य उध्वस्त करीत नव्हते, परंतु ही एक वाईट सवय होती जी मला माझ्या चांगल्या गोष्टी करण्यापासून रोखत होती.'
4 / 9
या व्यसनापासून स्वत: हून दूर झाल्यानंतर जॅक जेनकिन्सला एक अ‍ॅप तयार करण्याची कल्पना सुचली. जी लोकांना अश्लील व्यसनातून मुक्त होण्यास मदत करेल. त्यानुसार, जॅक जेनकिन्सने ‘क्विट पॉर्न फॉर गुड’ नावाचे अॅप तयार केले आहे, जे अशा लोकांना 90 दिवसांच्या आत पॉर्नच्या व्यसनापासून दूर ठेवते.
5 / 9
या अॅपमध्ये टेक्नॉलॉजी आणि मानवी सहाय्यता या दोन्हींचे संयोजन आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ती या व्यसनातून मुक्त होऊ शकेल. जॅक जेनकिन्सने तयार केलेले अॅप 1 लाखाहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले आहे.
6 / 9
डरहम युनिव्हर्सिटीमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या 31 वर्षीय जॅक जेनकिन्सला 2019 मध्ये आपल्या वाईट सवयी सुटल्यानंतर त्याला अॅप तयार करण्याची कल्पना सुचली.
7 / 9
आतापर्यंत गुंतवणूकदारांनी त्यांच्या अॅपमध्ये 920,000 युरो म्हणजेच जवळपास 8 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे आणि आता हे अॅप लोक मोठ्या प्रमाणात वापरत आहेत.
8 / 9
या अ‍ॅपमध्ये पॉर्न साइटचे अॅक्सेस रोखण्यासाठी 'लॉक फोन' फंक्शन आहे आणि अशा प्रकराच्या मनाची स्थिती असलेल्या हे अॅप लोकांना मदत करते.
9 / 9
दरम्यान, याबाबत यूके रीहॅब या संस्थेने म्हटले आहे की, जेव्हा अशा प्रकरणांची तपासणी केली जाते, तेव्हा कधीकधी 13 वर्षाची मुलेदेखील पॉर्न पाहत असल्याचे आढळून आले आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानJara hatkeजरा हटके