शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Lok Sabha Election 2019 : ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ मोबाईल गेम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 3:46 PM

1 / 8
लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे राजकीय रंग चढू लागले आहे. मोबाईलमधील प्ले-स्टोअर अ‍ॅपमध्ये आता ‘मोदी रन’, ‘राहुल रन’, ‘मोदी व्हर्सेस केजरी’ या राजकीय नेत्यांच्या नावाने गेम्सची निर्मिती करण्यात आली आहे.
2 / 8
तरुण व नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्ष विविध कल्पनांचा वापर करीत आहेत. या निवडणुकीत 8 कोटी 40 लाख तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न चालविला आहे.
3 / 8
व्हिडीओ गेम्स आतापर्यंत दहा लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहेत. या मोबाइल गेम्सची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीत व्हिडीओ गेम्सची निर्मिती केली आहे.
4 / 8
निवडणुकीदरम्यान टू-डी व थ्री-डी ग्राफिक्समध्ये या गेम्सची उपलब्ध आहेत. यातील अनेक गेम्स 2015 पासून प्लेस्टोरमध्ये आहेत मात्र निवडणुकीच्या माहोलमध्ये अपडेट करण्यात आले आहेत.
5 / 8
‘मोदी फॉर इंडिया 2019’ नावाच्या मोदींवर आधारित गेममध्ये आभासी मोदींच्या माध्यमातून येणाऱ्या अनेक संकटावर मात करत मोदी कशाप्रकारे पुढे जात आहे हे दाखवण्यात आले आहे.
6 / 8
‘मोदी रन - 2019’ या गेममध्ये वापरकर्त्याला आभासी कमळाची फुले गेम जिंकण्यासाठी एकत्र करायची असतात. विशेष म्हणजे हे गेम खेळताना नोटाबंदी , राफेल, जीएसटीसारख्या अडचणींपासून स्वत:ला वाचवायचे असते .
7 / 8
‘मोदी वर्सेस केजरी’ या गेममध्ये आभासी जगातील मोदी आणि केजरीवालांमध्ये सत्तेच्या खुर्चीसाठी खेळले जाणारे युद्ध दाखवण्यात आले आहे.
8 / 8
‘राहुल रन’ गेममध्ये जिंकण्यासाठी आभासी हाताचे पंजे एकत्र करायचे आहेत.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाcongressकाँग्रेस