Light Bill: घरातला स्वीच बोर्डवरील इंडिकेटर किती वीज खातो? काढून टाकल्यास लाईट बिल कमी येईल...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 01:07 PM2023-03-20T13:07:59+5:302023-03-20T13:21:45+5:30

तुमच्या घरात प्रत्येक खोलीत स्वीच बोर्ड असतील. त्यावर एक लाईट आहे की नाही हे दाखविणारा इंडिकेटर असेल तर.... वेळीच सावध व्हा...

आजकाल सर्वांनाच लाईट बिल जास्तीचे येत आहे. घरात उपकरणे कमी आहेत, परंतू बिल मात्र भरमसाठ येतेय. आता प्रत्येकाच्या हाती मोबाईल आलेला आहे. टीव्ही, फ्रिज, एसी चांगल्या रेटिंगचे घेतले आहेत. जुने बल्ब, ट्युबलाईट काढून एलईडी लावले आहेत. तरी बिल जास्त येतेय. मग तुम्हाला काही छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागणार आहे.

तुमच्या घरात प्रत्येक खोलीत स्वीच बोर्ड असतील. त्यावर एक लाईट आहे की नाही हे दाखविणारा इंडिकेटर असेल. आता तर बटनातच इंडिकेटर येत आहेत. यात तुम्हाला बटन चालू केल्यावर लाईट पेटते, बटन बंद केल्यावर लाईट बंद होते. असेच काही जुने इंडिकेटर आहेत.

हे इंडिकेटर आपल्या उपयोगी आहेत. परंतू ते वीजही घेतात. तुम्हाला वाटत असेल अशी घेऊन घेऊन किती घेतील? परंतू हा आकडा खूप मोठा आहे. जो तुमच्या महिन्याच्या वीज बिलावर मोठा परिणाम करतो.

महत्वाचे म्हणजे हे इंडिकेटर्स २४ तास सुरु असतात. ते आतील बल्ब पेटविण्यासाठी वीज घेतात. परंतू आपण याकडे कधी लक्ष देत नाही. देशात व्होल्टेज सप्लाय २३० ते २४० व्होल्टने होतो. जर इंडिकेटर चालू असेल तर दर तासाला जवळपास 0.3 ते 0.5 वॉट वीज वापरतो. म्हणजे दिवसाला 7.2 ते १२ वॉट वीज वापरली जाते.

ही एका इंडिकेटरची झाली. जर तुमच्या घरात १० बोर्ड आहेत आणि प्रत्येक बोर्डवर इंडिकेटर आहे. तर दिवसाला ७२ ते १२० वॉट वीज वापरली जाईल. आता इथे तुमच्या इलेक्ट्रीशिअनला बोलवायची गरज आहे...

आपण १० इंडिकेटरचा विचार करू, जर प्रती युनिट साडे सात रुपये आकारले जात असतील आणि इंडिकेटर 1.73 किलोवॉट वीज वापरत असेल तर दिवसाला १२.९६ रुपयांची वीज वापरली जाते. महिन्याला याचे ३८८ रुपये होतात. म्हणजेच एक इंडिकेटर महिन्याला ३८ ते ५० रुपयांची वीज वापरतो. म्हणजेच तुमचे बिल वाढते. जर तुम्ही १००, २०० युनिटचा आकडा ओलांडला तर पुढील युनिटचा चार्जही वाढतो.

वर्षाचा विचार केला तर तुमचे विजबिल एका इंडिकेटरमागे 405.6 ते ६०० रुपयांनी वाढते. यामुळे जर विज बिल कमी करायचे असेल तर तुम्हाला प्रत्येक खोलीत इंडिकेटर न लावता ते गरजेच्या खोलीत लावावेत. जिथून सर्व ठिकाणावरून लाईट आहे की नाही हे पाहता येईल.

हे इंडिकेटर लाईट आहे की गेली हेच दाखवत नाही, तर तो व्होल्टेजबाबतही सांगतो. जर या इंडिकेटरची लाईट खाली-वर होत असेल तर समजावे की व्होल्टेजदेखील कमी जास्त होत आहे. हे व्होल्टेज तुमच्या घरातील टीव्ही, फ्रिज, एसी सारख्या उपकरणांना हाणी पोहोचवू शकते.