शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Signal अॅपवर 'असा' ट्रान्सफर करा WhatsApp Group; पाहा, सोपी पद्धत

By देवेश फडके | Published: January 20, 2021 5:49 PM

1 / 8
नवीन प्रायव्हसी पॉलिसीचा चांगलाच फटका WhatsApp ला बसताना पाहायला मिळत आहे. या नवीन पॉलिसीमुळे गोपनीयतेचा भंग होत असल्याने अनेक युझर्स WhatsApp सोडून सिग्नल आणि टेलिग्राम यांसारख्या अॅपकडे वळले आहेत.
2 / 8
जगभरात WhatsApp च्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गजांनी अन्य पर्यायांकडे वळावे, असे आवाहन केले आहे. तर, अनेकांनी सिग्नलचा पर्याय स्वीकारल्याचे सोशल मीडियावरून सांगितले होते. बड्या मंडळींचे अनुकरण करत अनेकांनी सिग्नल आणि टेलिग्रामचा रस्ता धरला.
3 / 8
WhatsApp च्या प्रायव्हसी पॉलिसीचा प्रचंड फायदा Signal आणि Telegram ला झाला आहे. अल्पावधीत या दोन्ही अॅपच्या युझर्सची संख्या कोट्यवधीने वाढली. यातच व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत भारतातील आघाडीचे फ्री अ‍ॅप बनल्याची माहिती सिग्नल अ‍ॅपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
4 / 8
गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधी युझर्सनी व्हॉट्सअ‍ॅपला रामराम केला आहे. आता व्हॉट्सअॅप सोडून सिग्नल अ‍ॅपवर गेलेल्या युझर्सना मात्र आपला व्हॉट्सअ‍ॅपचा डेटा कसा ट्रान्सफर करायचा, असा प्रश्न पडला आहे. या चिंतेत तुम्हीही असाल, तर WhatsApp चे ग्रुप Signal अ‍ॅपवर ट्रान्सफर कसे करावेत, याबाबत आता आपण माहिती घेऊ.
5 / 8
सर्वप्रथम गुगल प्ले-स्टोअरवरुन Signal अ‍ॅप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. यानंतर सिग्नल अॅपवर एक ग्रुप क्रिएट करा. यात किमान एका व्यक्तीला अ‍ॅड करा. पुढे Signal अॅपच्या ग्रुप सेटिंग्समध्ये जाऊन Group link पर्यायावर टॅप करा.
6 / 8
पुढील पायरी म्हणजे ग्रुप लिंकवर टॉगल ऑन करून Share पर्यायावर टॅप करा. तुम्हाला एक ग्रुप लिंक येईल. यानंतर, आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप चॅट ओपन करा आणि ग्रुप लिंक पोस्ट करा. या पोस्ट केलेल्या लिंकला अ‍ॅक्सेस करणारा कोणताही वापरकर्ता अ‍ॅडमिनच्या परवानगीनंतरच Signal ग्रुपमध्ये चॅटिंग करू शकतो.
7 / 8
विशेष म्हणजे अ‍ॅडमिन कधीही ही लिंक बंद करू शकतो. यासंदर्भातील माहिती सिग्नल अॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. दरम्यान, प्रायव्हसी पॉलिसीच्या प्रस्तावित बदलांमुळे युझर्सची नाराजी ओढवून घेतलेल्या व्हॉट्सॲपला आता केंद्र सरकारनेही जाब विचारला.
8 / 8
व्हॉट्सअॅपचा धोरणबदलाचा एकतर्फी निर्णय अन्यायकारक आणि अस्वीकारार्ह असून, धोरण तातडीने मागे घेण्यात यावे, अशा आशयाचे खरमरीत पत्र केंद्राने व्हॉट्सॲपला लिहिले आहे. भारतात व्हॉट्सॲपचे सर्वाधिक वापरकर्ते असून, त्यांच्या संमतीविना व्हॉट्सॲपने आपल्या सेवा शर्ती आणि व्यक्तिगतता धोरणासंदर्भातील बदल प्रस्तावित करणे म्हणजे भारतीय नागरिकांच्या निवड स्वातंत्र्याविषयी चिंतित होण्यासारखे असल्याचे मंत्रालयाने आपल्या पत्रात नमूद केले आहे.
टॅग्स :MobileमोबाइलWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपSocial Mediaसोशल मीडिया