एकापेक्षा एक ढांसू प्लॅन! 500 रुपयांपेक्षा कमी किमतीत देतायेत जबरदस्त Benefits
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 16:37 IST2022-05-13T16:28:26+5:302022-05-13T16:37:33+5:30
Jio vs Airtel vs Vi Prepaid Plans under Rupees 500 : आज आम्ही अशा प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (Vi) आपल्या युजर्संना असे अनेक प्लॅन ऑफर करत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त बेनिफिट्स दिले जात आहेत. आज आम्ही या कंपन्यांच्या त्या प्लॅनबद्दल सांगत आहोत, ज्यांची किंमत 500 रुपयांपेक्षा कमी आहे.
जिओचा 299 रुपयांच्या प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 SMS मिळतात. हा प्लॅन 28 दिवसांच्या वैधतेसह येतो.
व्हीआयचा 319 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनची किंमत 319 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 2GB डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 SMS चे फायदे दिले जात आहेत. यामध्ये कोणताही OTT फायदा नाही, परंतु तो कंपनीच्या वीकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईट लाभांसह येतो. या प्लॅनची वैधता 31 दिवसांची आहे.
व्हीआयचा 359 रुपयांचा प्लॅन
28 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनची किंमत 359 रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस आणि 3GB डेटासह कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंगचे बेनिफिट्स मिळते. या प्लॅनमध्येवीकेंड डेटा रोलओव्हर आणि बिंज ऑल नाईटचे फायदे देखील आहेत.
एअरटेलचा 399 रुपयांचा प्लॅन
या प्रीपेड प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2.5GB हाय-स्पीड डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचे फायदे मिळतात. हा प्लॅन तीन महिन्यांच्या Disney + Hotstar च्या सब्सक्रिप्शनसोबत येतो.
जिओचा 499 रुपयांचा प्लॅन
वरील प्लॅनपेक्षा हा प्लॅन सर्वात महागडा आहे, त्याची किंमत 499 रुपये आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये युजर्संना 2GB डेटा, दररोज 100 एसएमएस आणि कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ अॅप्ससह Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन देखील दिले जात आहे.
एअरटेलचा 499 रुपयांचा प्लॅन
एअरटेलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे मोबाइल एडिशन आणि Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन एका वर्षासाठी मिळेल. तसेच, हा प्लॅन 2GB डेली डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 SMS च्या बेनिफिट्ससह येतो. हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे.