itel A100 रिव्ह्यू: बजेटमधला स्मार्टफोन, कोणासाठी? दररोजचे हजारो व्हॉट्सअप मेसेज आणि काही फोन...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:54 IST2026-02-09T16:09:08+5:302026-02-09T17:54:39+5:30
itel A100 Review: ७ हजार रुपयांच्या बजेटमध्ये ९०Hz डिस्प्ले आणि ५०००mAh बॅटरी असलेला itel A100 कसा आहे? वाचा या नव्या स्मार्टफोनचा सविस्तर रिव्ह्यू आणि फीचर्स.

आयटेल या परवडणाऱ्या श्रेणीतील स्मार्टफोन निर्मात्या कंपनीने आज आयटेल १०० सी हा फोरजी स्मार्टफोन लाँच केला आहे. साधारण आठवडाभरापासून हा फोन आम्ही वापरत आहोत. दररोजचे कॉलिंग, हजारोंच्या संख्येने येणारे व्हॉट्सअप मेसेज आणि युट्यूब,हॉटस्टारवरील व्हिडीओ आम्ही या फोनवर पाहत आहोत. आम्हाला कसा वाटला हे जाणून घेऊया...

लुकवरून बजेट डिव्हाइस असले तरी फ्लॅगशिप फोन असल्याचे दिसते. मर्यादित बजेट असलेल्या युजर्सना डोळ्यासमोर ठेवून हा फोन डिझाइन करण्यात आला आहे. या फोनमध्ये ६.६ इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्झ देण्यात आला आहे. यावर व्हिडीओ क्वालिटी चांगली आहे. तसेच एकच स्पीकर देण्यात आला आहे. ज्याचा आवाजही ठीकठाक आहे.

या फोनमध्ये अँड्रॉईड १५ गो एडिशन देण्यात आली आहे, कमी रॅमच्या फोनसाठी चांगली आहे. दिवसाला हजारो व्हॉट्सअप मेसेज आणि थोडेफार फोन कॉल आदी वापरासाठी आम्हाला कुठेही अडचण आली नाही. Unisoc T7100 चिपसेट देण्यात आला असून अॅप ओपन होण्यासाठी काहीसा वेळ घेतो परंतू नंतर कुठेही फोन हँग होत नाही. तसेच फोन गरम देखील होत नाही.

छोटे मोठे गेम देखील आम्ही यावर खेळून पाहिले आहेत. फेस अनलॉक आणि साईड माऊंटेड फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आले आहे. जे चांगल्याप्रकारे काम करते.

कॅमेरा
रिअरला ८MP चा कॅमेरा आणि सेल्फीसाठी ५MP चा फ्रंट कॅमेरा आहे. सेल्फीमध्ये ब्युटी मोड देण्यात आला आहे. यामध्ये स्मूथ, अॅक्ने, टोन असे पर्याय आहेत. याद्वारे फोटोमध्ये चांगले दिसायला होते. टाईम लॅप्स, कॅप्चर, पोर्टेट, पॅनारोमा आणि प्रो असे फिचर देण्यात आले आहेत. दिवसाच्या उजेडात फोटो ठीकठाक येतात, रात्री फोटो घेताना कॅमेरा थोडा झगडतो.

बॅटरी
या फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी दीड दिवस येते. शून्य ते १०० टक्के चार्ज होण्यासाठी साधारण २.४५ मिनिटे लागतात. १५ वॉटचा चार्जर या सोबत देण्यात आला आहे.

दररोजचा सामान्य वापर असेल, घरामध्ये एखादा फोन हवा, वडिलधाऱ्यांना हवा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. तसेची फाईव्ह जीची रिचार्ज महाग आहेत. फोरजी रिचार्जच बहुतांश ग्रामीण भागात केली जातात. यामुळे अशा लोकांसाठी ६७९९ रुपयांमध्ये परवडणारा फोन आहे.

















