शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुपचूप Instagram वर बघा कोणाचीही स्टोरी, सोप्या ट्रिकमुळे समोरच्याला दिसणार नाही तुमचं नाव

By सिद्धेश जाधव | Published: May 17, 2022 3:00 PM

1 / 6
Instagram जगभरातील सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेल्या टॉप अ‍ॅप्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 2022 च्या पहिल्या तिमाहीत इंस्टाग्रामची लोकप्रियता कायम राहिली आहे. एकेकाळी फोटो शेयरिंग अ‍ॅप म्हणून लोकप्रिय असेलल्या या प्लॅटफॉर्मची ओळख आता शॉर्ट व्हिडीओ शेयरिंग अ‍ॅप अशी होत आहे.
2 / 6
अजूनही इंस्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ स्टोरी देखील मोठ्याप्रमाणावर शेयर होतात. या स्टोरीज कोणी बघितल्या हे अपलोड करणाऱ्याला समजतं. परंतु गुपचूप इंस्टा स्टोरी बघायची असल्यास काय करावं? चला जाणून घेऊया.
3 / 6
इंस्टाग्रामवर अपलोड केलेली स्टोरी डिलीट न केल्यास 24 तास प्लॅटफॉर्मवर राहते. या काळात तुमचे फॉलोवर्स आणि अकाऊंट पब्लिक असल्यास अन्य युजर्स देखील बघू शकतात. अशा स्टोरीज बघणाऱ्या युजरची माहिती स्टोरी अपलोड करणाऱ्या व्यक्तीला पुढील चोवीस तास देखील बघता येते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीची स्टोरी बघायची असेल आणि तुम्ही ती स्टोरी बघितली आहे हे अपलोडरला कळू द्यायचं नसेल तर पुढील ट्रिक वापरा.
4 / 6
Instagram वर स्टोरी प्रीलोड होते, अर्थात तुम्ही अ‍ॅप ओपन केल्यावर स्टोरीज लोड झालेल्या असतात. जर तुम्हाला गुपचूप स्टोरीज बघायच्या असतील तर तुमचा स्मार्टफोन एयरप्लेन मोडवर टाका आणि ती स्टोरी बघा. म्हणजे तुम्ही बघितलेल्या स्टोरीच्या दर्शकांच्या यादीत तुमचं नाव दिसणार नाही.
5 / 6
काही कारणांमुळे स्टोरी प्रीलोड होत नाहीत. यावर देखील एक उपाय आहे. यासाठी ज्या व्यक्तीची स्टोरी बघायची आहे त्याच्या अकाऊंटवर जा आणि थोडी वाट बघा त्यानंतर फोन पुन्हा एयरप्लेन मोडवर टाका. आता स्टोरी ओपन केल्यास तुमचं नाव दर्शकांच्या यादीत दिसणार नाही.
6 / 6
प्लेस्टोरवर अनेक थर्ड पार्टी अ‍ॅप्स तुम्हाला गुपचूप स्टोरी बघण्यास मदत करतील. परंतु हे अ‍ॅप्स व्हेरीफाईड नसतात आणि तुमच्या डेटासाठी धोकादायक ठरू शकतात.
टॅग्स :Instagramइन्स्टाग्राम