शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

इन्फिनिटी-ओ डिस्प्लेचा Samsung Galaxy A8s लाँच; कोपऱ्यावर कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 8:05 PM

1 / 6
दक्षिण कोरियाची प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी सॅमसंगने Samsung Galaxy A8s हा इन्फिनिटी-ओ डिस्प्ले असलेला जगातल पहिला फोन चीनमध्ये आज लाँच केला आहे. याचबरोबर कंपनीने Galaxy A8s FE हे महिलांसाठी असलेल्या फोनचे व्हर्जन आणले आहे.
2 / 6
Samsung Galaxy A8s मध्ये उजव्या बाजुला डिस्प्लेमध्येच कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने अद्याप या मोबाईलच्या किंमतीबाबत काहीही सांगितले नाही, तसेच भारतात हा मोबाईल कधी लाँच होईल याबाबतही सांगितलेले नाही.
3 / 6
Galaxy A8s मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच क्वालकॉम स्नैपड्रैगन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी Kryo 360 CPU आणि Adreno 616 GPU देण्यात आला आहे.
4 / 6
Galaxy A8s मध्ये दोन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस तर दुसऱ्या मॉडेलमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.
5 / 6
Galaxy A8s मध्ये अँड्रॉईड 8.1 ओरियो देण्यात आली आहे. तसेच Samsung Experience UI 9.5 ही युआय देण्यात आली आहे. अॅल्युमिनिअम फ्रेमसह ग्लॉसी फिनिशही देण्यात आले आहे.
6 / 6
या फोनमध्ये पाठीमागे ट्रिपल रियर कैमरा सेटअप देण्यात आला आहे. प्रायमरी सेन्सर 24 मेगापिक्सलचा आणि सेकंडरी सेन्सर 10 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तिसरा सेन्सर 5 मेगापिक्सलचा आहे.