फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 22:02 IST
1 / 7आजकाल प्रत्येक काम इंटरनेटशिवाय अपूर्ण आहे. फोनमधील ॲप्स, टीव्हीवरील वेब सिरीज किंवा युट्यूबवरील गाणी ऐकण्यासाठी इंटरनेटची गरज असते. पण, प्रत्येकाच्या घरी वाय-फाय असेलच असे नाही, त्यामुळे अनेकजण मोबाईल डेटावर अवलंबून असतात. तुमचाही डेटा लवकर संपत असेल, तर या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचा डेटा वाचवू शकता.2 / 7अनेक ॲप्स वापरत नसतानाही बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात आणि इंटरनेट वापरतात. हे थांबवण्यासाठी, फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन 'Background Data Usage' हा पर्याय बंद करा. यामुळे अनावश्यक ॲप्सवर डेटा खर्च होणार नाही.3 / 7गुगल प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरमध्ये ऑटो-अपडेटचा पर्याय चालू असतो. त्यामुळे नवीन अपडेट आल्यावर फोन आपोआप तो डाउनलोड करतो. हे थांबवण्यासाठी, प्ले स्टोरच्या सेटिंग्समध्ये जा आणि 'ॲप्स ऑटो-अपडेट'चा पर्याय 'Over Wi-Fi only' असा सेट करा.4 / 7व्हिडीओ पाहणे हा डेटा वापरण्याचा सर्वात मोठा स्त्रोत आहे. जर तुम्ही युट्यूब, इन्स्टाग्राम किंवा इतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर हाय-क्वालिटी व्हिडीओ पाहत असाल, तर डेटा खूप लवकर संपतो. त्याऐवजी, तुम्ही 480p किंवा 720p पर्याय निवडा. यामुळे व्हिडीओची स्पष्टता चांगली राहील आणि डेटाही वाचेल.5 / 7क्रोम किंवा इतर ब्राउझरमध्ये 'लाइट मोड' किंवा 'डेटा सेव्हर' नावाचे फीचर असते. हे फीचर चालू केल्यावर ब्राउझर पेजला कॉम्प्रेस करून उघडतो, ज्यामुळे कमी डेटा वापरला जातो.6 / 7अनेक ॲप्स सतत नोटिफिकेशन्स पाठवतात आणि त्यासाठी डेटा वापरतात. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन तुम्हाला नको असलेल्या ॲप्सच्या नोटिफिकेशन्स बंद करू शकता. यामुळे डेटासोबतच तुमच्या फोनची बॅटरीही जास्त काळ टिकेल.7 / 7युट्यूब आणि स्पॉटिफायसारखे ॲप्स व्हिडीओ आणि गाणी डाउनलोड करून ऑफलाइन पाहण्याचा किंवा ऐकण्याचा पर्याय देतात. वाय-फाय कनेक्शन असताना हे व्हिडीओ आणि गाणी डाउनलोड करा आणि तुमचा मोबाईल डेटा वाचवा.