iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 21:44 IST2025-08-04T21:38:43+5:302025-08-04T21:44:40+5:30

Massive Discount On iPhone 16: अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सेलमध्ये आयफोन १६ सिरीजच्या फोनवर मोठी सूट मिळत आहे.

आयफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि अमेझॉनने आयफोन १६ च्या किंमतीत मोठी कपात केली आहे.

लवकरच आयफोन १७ बाजारात दाखल होणार आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आयफोनची पुढील आवृत्ती लॉन्च करते. त्यामुळे आयफोन १७ सप्टेंबर महिन्यात लॉन्च होईल, अशी अपेक्षा आहे.

फ्लिपकार्टच्या फ्रीडम सेलमध्ये आयफोन १६ (१२८ जीबी) ७९,९०० रुपयांवरून ६९,९९९ रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर, अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम सेलमध्ये हा फोन ७१,९०० रुपयांना उपलब्ध आहे.

फ्लिपकार्ट सेलमध्ये आयफोन १६ प्रोवर १२,००० रुपयांचं डिस्काउंट दिले जात असून हा फोन १ लाख ०७ हजार ९०० रुपयांना विकला जात आहे. हा फोन १ लाख १९ हजार ९०० रुपयांना लॉन्च करण्यात आला. तर, अॅमेझॉनवर हा फोन अमेझॉनवर १ लाख ११ हजार ९०० रुपयांना विकला जात आहे.

अ‍ॅक्सिस बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँकेच्या कार्डवर अतिरिक्त चार हजार रुपयांचा कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे हा फोन ग्राहकांना ६३ हजार ४९९ रुपयांत मिळू शकतो.