कमाल! आता WhatsApp वर इंटरनेटशिवाय पाठवता येणार फोटो, Video; जाणून घ्या, नेमकं कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 04:51 PM2024-04-24T16:51:24+5:302024-04-24T16:58:40+5:30

नव्या फीचरच्या मदतीने युजर्स इंटरनेटशिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकतील.

इंटरनेटची सुविधा नसताना WhatsApp काम करणं थांबवतं. अशा परिस्थितीत अनेक वेळा तुम्ही महत्त्वाच्या फाइल्स, फोटो आणि व्हिडीओ ट्रान्सफर करू शकत नाही. हे लक्षात घेऊन WhatsApp आता लवकरच एक नवीन फीचर लॉन्च करू शकते.

नव्या फीचरच्या मदतीने युजर्स इंटरनेटशिवाय फोटो आणि व्हिडीओ शेअर करू शकतील. हे एक स्टँडअलोन फीचर असेल, जे युजर्स लोकल नेटवर्कच्या मदतीने फाइल्स, फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याचा पर्याय देतं. यामध्ये इंटरनेटला बायपास केलं जातं.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp लवकरच लोकल फाइल शेअरिंग फीचर आणू शकतं, ज्याच्या मदतीने युजर फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंट्स शेअर करू शकतील. यासाठी युजर्सना nearby फीचर आवश्यक आहे. हे फीचर ऑन केल्यानंतर युजर्स त्यांच्या फाईल्स ट्रान्सफर करू शकतील.

रिपोर्ट्सनुसार, WhatsApp युजर्सना सर्वात आधी सेटिंगमध्ये जाऊन ब्लूटूथ ऑन करावं लागेल. त्यानंतर या फाइल्स दुसऱ्याला पाठवू शकता. या फाइल्स इन्स्टंट मेसेजिंग एपमधील इतर मजकुराप्रमाणे एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.

रिपोर्ट्सनुसार, हे फीचर काम करण्यासाठी एपला अँड्रॉइड परवानग्या आवश्यक असतील. फाइल्स ऑफलाइन शेअर करण्यासाठी, तुम्ही फाइल शेअर करत असलेल्या डिव्हाइसमध्ये ऑफलाइन फाइल शेअरिंग फीचर उपलब्ध असणे आवश्यक आहे. एपच्या आगामी अपडेट्समध्ये हे फीचर रोलआउट केले जाऊ शकते.

रिपोर्टनुसार, जवळपासच्या डिव्हाईसची ओळख, कनेक्ट आणि स्थिती जाणून घेण्यासाठी परमिशन आवश्यक असेल. अशा परिस्थितीत युजर्स त्यांना पाहिजे तेव्हा ही परमिशन बंद करू शकतात.

WhatsApp च्या या नव्या फीचरवर सध्या काम सुरू आहे आणि अद्याप त्याच्या रिलीजबाबत जास्त माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असून ते सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं.