घरबसल्याच मिळवा ATM सारखं Aadhaar Card; पाहा संपूर्ण प्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 04:12 PM2021-05-03T16:12:26+5:302021-05-03T16:19:26+5:30

सुरक्षेच्या दृष्टीनंही यात देण्यात आलेत महत्त्वाचे फीचर्स

आधार कार्ड (Aadhaar Card) हे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आपलं आधार कार्ड बँक खाती आणि पॅन कार्डशी जोडलेले आहे, तसेच सरकारी योजनांमध्येही याची आवश्यकता भासते.

आता आधार कार्ड आयडी कार्ड म्हणूनही वापरला जात आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडे नेहमीच आधार कार्ड असणे महत्वाचे आहे.

बहुतेक लोकांकडे असलेले आधार कार्ड कागदावर कलर प्रिन्ट केलेलं असतं. तथापि, आपल्याला हवं असल्यास आपण क्रेडिट किंवा डेबिड कार्डासारखं दिसणारं आधार कार्डदेखील अर्ज करू शकता.

दरम्यान, अनेकदा आपल्याला आपलं आधार कार्ड फाटण्याची वैगेर भीती वाटत असते.

परंतु आधार कार्ड जारी करणार्‍या विभागाच्या (UIDAI) वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार आपण पीव्हीसी कार्डवर छापलेले आधार कार्डासाठीदेखील अर्ज शकता.

खास गोष्ट म्हणजे आपण घरी बसून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. एवढेच नव्हे तर स्पीड पोस्टद्वारे थेट आपल्या घरी तुमच्या घरापर्यंतही येईल.

पीव्हीसी आधारकार्डात होलोग्राम, Guilloche पॅटर्न, Ghost Image आणि मायक्रोटेक्स्टसारखे सिक्युरिटी फीचर्सही असतात.

यात असलेल्या क्यूआर कोडद्वारे ऑफलाइन पडताळणी त्वरित केली जाऊ शकते. या कार्डासाठी तुम्हाला फक्त ५० रुपये शुल्क द्यावे लागेल.

या कार्डासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम UIDAI ची वेबसाईट (uidai.gov.in/my-aadhaar/get-aadhaar.html) वर जावं लागेल.

त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी आपला १२ डिजिट आधार क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल.

त्यानंचक त्या ठिकाणी असलेल्या Send OTP या ऑप्शनवर क्लिक करा.

तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी टाकून सबमिटवर क्लिक करा.

त्या ठिकाणी असलेली तुमची माहिती योग्य आहे का नाही याची पडताळणी करून घ्या. त्यानंतर Payment वर क्लिक करा.

यानंतर तुम्ही युपीआय, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरू शकता.

पैसे भरल्यानंतर तुम्हाला एक स्लीप मिळेल. काही दिवसांनी तुमचं आधार कार्ड स्पीड पोस्टद्वारे तुमच्या पत्त्यावर येईल.