शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जबराट फिचर! स्मार्टफोन खिशात ठेवा, विंडोज लॅपटॉपवर हवे ते अँड्रॉईड अ‍ॅप वापरा

By हेमंत बावकर | Published: November 09, 2020 12:58 PM

1 / 10
ऑफिसमध्ये काम करताना लॅपटॉप, डेस्कटॉपवर असतो. परंतू कामावेळी मोबाईलही समोर ठेवावा लागतो. अशावेळी मोबाईलमधील अॅप डेस्कटॉप, लॅपटॉपवर वापरता आली तर? असे साऱ्यांनाच वाटते. कारण आपल्या कामाची आणि मनोरंजनाची अ‍ॅप डेस्कॉपवरही हवी हवीशी वाटतात.
2 / 10
जर तुम्ही विंडोज ओएस असलेल्या पीसी किंवा लॅपटॉपवर मोबाईलमधील अँड्रॉईड अ‍ॅप वापरू इच्छित असाल तर तुमच्यासाठी जबरदस्त बातमी आहे. मायक्रोसॉफ्टने Your Phone हे अ‍ॅप आधीच विकसित केले होते. मात्र, आता मल्टीपल अ‍ॅप सपोर्ट जारी केला आहे.
3 / 10
युअर फोन हे विंडोज सॉफ्टवेअर वापरून तुम्ही तुमचा पीसी स्मार्टफोनला कनेक्ट करू शकता. यामुळे तुम्हाला विंडोजवरही मोबाईलमधील अ‍ॅप वापरता येणार आहेत.
4 / 10
मायक्रोसॉफ्टच्या अधिकृत वेबसाईटनुसार नवीन फिचरद्वारे युजर्स विंडोज 10 असलेल्या लॅपटॉपवर अनेक अँड्रॉईड अ‍ॅप वापरता येणार आहेत. सध्या हे फिचर काही सॅमसंग मोबाईलसाठी लिमिटेड ठेवण्यात आले आहे.
5 / 10
तसेच ही फिचर विंडोज इनसायडर कम्युनिटी आणि डेव्हलपर्स, टेस्टरसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर ते अन्य मोबाईल धारकांसाठीही उपलब्ध केले जाईल.
6 / 10
हे फिचर सुरुवातीला काही मोजक्या युजरसाठी असून त्यांनी दिलेल्या अभिप्रायानुसार सुधारणा करून काही दिवसांनी ते सर्वांसाठी खुले केले जाईल, असे मायक्रोसॉफ्टने सांगितले.
7 / 10
सॅमसंग गॅलेक्सी Note 20 5G, सॅमसंग गॅलेक्सी Note 20 Ultra 5G, सॅमसंग गॅलेक्सी Z Fold2 5G, सॅमसंग गॅलेक्सी Z flip, सॅमसंग गॅलेक्सी Z Flip 5G, सॅमसंग गॅलेक्सी S20 5G, सॅमसंग गॅलेक्सी S20 Plus 5G, सॅमसंग गॅलेक्सी S20 Ultra 5G.
8 / 10
मायक्रोसॉफ्टने सांगितले की, विंडोज 10 असलेले लॅपटॉपवर हे अ‍ॅप वापरता येणार आहेत. फक्त अँड्रॉईडच नाही तर अ‍ॅपलचे आयफोनही कनेक्ट करता येणार आहेत.
9 / 10
युजर Your Phone हे अ‍ॅप मायक्रोसॉफ्ट स्टोअरवरूनही डाऊनलोड करू शकतात. यामुळे फोन, नोटिफिकेशनही मॅनेज करता येणार आहे. म्हणजेच तुम्ही पीसीवर काम करत असताना फोन आरामात खिशात ठेवला तरीही चालू शकणार आहे.
10 / 10
सध्या तसे पहायला गेले तर कॉम्प्युटरवर व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरता येत आहे. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवरील मॅसेज मॅनेज करता येतात.
टॅग्स :Androidअँड्रॉईडMobileमोबाइल