ट्रेंड बदलला! कोरोनाच्या संकटात Google वर देशात वेगळीच गोष्ट झाली सर्च, जाणून घ्या नेमकं काय शोधलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:20 PM2020-07-03T14:20:42+5:302020-07-03T15:37:57+5:30

गुगलवर काय ट्रेंड होतं याकडे सर्वांचंच लक्ष असतं. लोकांना सर्वात जास्त काय वाचायला आवडतं. सध्या लोकांचा काय मूड आहे याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे.

गुगल हे अत्यंत लोकप्रिय सर्च इंजिन असून यावर लोक अनेक गोष्टी सर्च करत असतात. राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते.

गुगलवर आपल्या आसपास घडलेल्या अनेक घटनांसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळीही लोकांनी अनेक गोष्टी सर्च केल्या आहेत. त्याबाबत जाणून घेऊया.

गुगलवर काय ट्रेंड होतं याकडे सर्वांचंच लक्ष असतं. लोकांना सर्वात जास्त काय वाचायला आवडतं. सध्या लोकांचा काय मूड आहे याचा गुगलच्या सर्च ट्रेंडने खुलासा केला आहे.

सध्या जगावर कोरोनाचे संकट आले आहे. जगभरातील अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान गुगलचा ट्रेंड बदललेला दिसत आहे. कोरोना काळात देशात Google वर वेगळाच मुद्दा सर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

जूनमध्ये लोकांनी कोरोना व्हायरससंबंधित गोष्टी सर्च केल्या. कोरोना व्हायरस कमकुवत होत आहे?, भारतात कोरोनोची लस कधी येणार? आणि कोरोनो व्हायरस कधी संपेल का? अशा माहितीसाठी शोध घेतला आहे.

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये हा शोध बर्‍यापैकी कमी झाला आहे. जूनमध्ये लोकांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल सर्वाधिक सर्च केलं आहे.

गुगलने दिलेल्या माहितीनुसार, भारतात जूनमध्ये अभिनेता सुशांत बद्दल जास्त प्रमाणात सर्च केलं गेलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला असल्याने त्याच्याबाबत जास्त सर्च करण्यात आलं आहे.

मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कोरोना व्हायरसबद्दल लोकांनी चर्च करणं कमी केलं आहे. यामध्ये तब्बल 66 टक्क्यांनी घट झाली आहे.

सुशांत सिंह राजपूतनंतर या यादीमध्ये सूर्यग्रहण दुसर्‍या क्रमांकावर होतं आणि त्यानंतर फादर्स डे विषयी लोकांनी माहिती सर्च केल्याचं समोर आलं आहे.

गुगल सर्चनुसार, भारतीय नेटिझन्स सध्याच्या परिस्थितीत कोरोना लसीबाबत बरेच प्रश्न विचारत आहेत. जूनमध्ये 'कोरोना व्हायरस न्यूज' सर्वप्रथम ट्रेंडिंगमध्ये होतं.

देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 6,25,544 वर गेला आहे.

जूनमध्ये गुगलवर पतंजली कोरोना मेडिसीन, ग्लोबल वॅक्सीन समिट आणि डेक्सामेथासोन या गोष्टीही सर्वात जास्त सर्च केल्या गेल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.